नेवासाच्या विकासाची गौरवगाथा – जनसुविधांचा वेग अधिकच वाढला!
श्री. विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या सातत्यपूर्ण व ठोस पाठपुराव्यातून नाबार्ड ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी (RIDF) योजनेंतर्गत मुरमे (देवगड) – जळके खु. – गोगलगाव रोडवरील पुलाच्या बांधकामासाठी तब्बल ₹५ कोटींच्या निधीस मंजुरी मिळाली आहे.

📰 खबरनामा न्यूज | नेवासा
नेवासाच्या विकासाची गौरवगाथा – जनसुविधांचा वेग अधिकच वाढला!
नेवासा तालुक्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी चालना मिळाली असून आमदार श्री. विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या सातत्यपूर्ण व ठोस पाठपुराव्यातून नाबार्ड ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी (RIDF) योजनेंतर्गत मुरमे (देवगड) – जळके खु. – गोगलगाव रोडवरील पुलाच्या बांधकामासाठी तब्बल ₹५ कोटींच्या निधीस मंजुरी मिळाली आहे.
या बहुप्रतिक्षित पुलाच्या उभारणीमुळे बेलपिंपळगाव गटातील मुरमे – जळके खु. – गोगलगाव, सलबतपूर – गळनिब – सुरेगाव – खेडलेकाजळी – गिडेगाव तसेच संपूर्ण पंचक्रोशीतील हजारो नागरिकांचा दैनंदिन प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित व वेगवान होणार आहे. पावसाळ्यातील अडचणी, वाहतुकीतील अडथळे आणि वेळेची होणारी नासाडी यावर कायमस्वरूपी तोडगा मिळणार आहे.
हा पूल केवळ वाहतुकीचा मार्ग नसून, शिक्षण, आरोग्य, शेतीमाल वाहतूक, रोजगार व आपत्कालीन सेवांसाठी जीवनवाहिनी ठरणार आहे. ग्रामीण भागाचा शहरी सुविधांशी संपर्क अधिक भक्कम होऊन नेवासा तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळणार आहे.
या महत्त्वपूर्ण विकासकामास मंजुरी दिल्याबद्दल
मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब,
उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब व मा. श्री. अजितदादा पवार साहेब,
सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले साहेब,
पालकमंत्री मा. श्री. राधाकृष्ण विखे पाटील साहेब
यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
👉 विकासासाठी कटिबद्ध नेतृत्व, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि जनतेच्या गरजांशी जोडलेली कामे – हीच आमदार श्री. विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या कार्यशैलीची ओळख असून, नेवासा तालुक्यात विकासाची ही घोडदौड अशीच अविरत सुरू राहो, हीच जनतेची अपेक्षा आहे.




