Breaking
ई-पेपरजिल्हा परिषद शाळा उपक्रमतहसीलतहसीलदार नेवासानेवासाब्रेकिंगविशेष निवड

काळेगाव शाळेची वाटचाल यश शिखराकडे – सोमनाथ कचरे

गुरु पौर्णिमेनिमित्त शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

0 7 0 1 7 0

 

काळेगाव शाळेची वाटचाल यश शिखराकडे – सोमनाथ कचरे

 

गुरु पौर्णिमेनिमित्त शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

 

शेवगाव | प्रतिनिधी : शहाराम आगळे

 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळेगाव मधील गुणवंत विद्यार्थ्यांमधील उत्साहामध्ये येथील शिक्षकांचा त्याग आहे. हे या शाळेच्या परिसरात आल्यानंतर जाणवते. ग्रामीण भागातील या शाळेने घेतलेली भरारी प्रेरणादायी आहे. कसदार शिक्षण हे यशस्वी जीवन घडवते. शिक्षकांच्या अथक परिश्रमातून अशा शाळा उभ्या राहतात व समाजात प्रेरणादायी ठरतात, असे स्पष्ट मत कुकाणा येथील मा. सरपंच तथा अखिल भारतीय पत्रकार परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ कचरे यांनी मांडले.

 

शेवगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळेगाव येथे गुरु पौर्णिमेनिमित्त शिक्षकांचा सन्मान व विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कुलस्वामिनी उद्योग समूहाचे युवा उद्योजक सोमनाथ वाबळे व सामाजिक कार्यकर्ते असिफ सय्यद उपस्थित होते.

 

पुनर्वशीत मोजक्याच घरांचे काळेगाव म्हणून ओळख असलेल्या गावांमध्ये तीन ते चार किलोमीटर वरून विद्यार्थी येतात, हेच या शिक्षकांच्या कामाची पावती आहे. अशा शिक्षकांच्या पाठीशी उभे राहून त्यांना बळ दिले पाहिजे. तेव्हाच विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना वाव मिळेल व आदर्श समाजाची निर्मिती होईल, असे विचार त्यांनी मांडले.

 

यावेळी विद्यार्थ्यांनेही आपले मनोगत व्यक्त केले.

 

यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शहाराम आगळे, अशोक सौदागर, रामेश्वर शेकडे, संभाजी कडूस, आजिनाथ सौदागर, बाळासाहेब लांडे, तुकाराम शेकडे, भाऊराव सौदागर, नामदेव पालवे यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मण पिंगळे यांनी केले, तर आभार शाळेचे मुख्याध्यापक संदीप आहेर यांनी मानले.

1/5 - (1 vote)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 0 1 7 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे