Breaking
ई-पेपरउठ घे मशाल अन्यायाला जाळ खुशालकायदा आणि प्रशासनगुन्हेगारीजिल्हाधिकारीतहसीलपोलीस स्टेशनभ्रष्टाचार आणि लाच लुचपतसंभाजीनगरस्वातंत्र्य दिन

ग्रामपंचायत टवलारचे ग्रामपंचायत अधिकारी अजय अंबादास देशमुख यांच्या विरुद्ध शिस्तभंग व निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश.*

उपमुख्य कार्यकारी जिल्हा परिषद अमरावती यांचे गटविकास अधिकारी अचलपूर यांना पत्र.*

0 2 2 2 2 2

*ग्रामपंचायत टवलारचे ग्रामपंचायत अधिकारी अजय अंबादास देशमुख यांच्या विरुद्ध शिस्तभंग व निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश.*

 

*उपमुख्य कार्यकारी जिल्हा परिषद अमरावती यांचे गटविकास अधिकारी अचलपूर यांना पत्र.*

अचलपूर : प्रतिनिधी टवलार ग्रामपंचायत हद्दीतील किरण पाटील चित्रकार यांनी मालमत्ता क्र. 420 व 421 या जागेत तार कंपाउंड करून 1222.17 चौ. फुटाचे शासकीय रस्त्यावर अतिक्रमण केलेले आहे, हे चौकशीत व अहवालात निष्पन्न झाल्यानंतर हे अतिक्रमण तात्काळ निष्कासित करण्यासाठी दि. 23 सप्टेंबर 2024 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती व गटविकास अधिकारी पंचायत समिती अचलपूर यांनी ग्रामपंचायत टवलारच्या नावे लेखी आदेश काढलेला होता.

 

परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या आदेशाला 4 महिन्यापासून केराची टोपली दाखवत ग्रामपंचायत टवलारचे ग्रामपंचायत अधिकारी श्री अजय अंबादास देशमुख यांनी सदर अतिक्रमणवर निष्कासित करण्याची कारवाई केली नाही.

 

म्हणून शासकीय कर्तव्य पार पाडतांना केलेल्या कसुरीबाबत ग्रामपंचायत अधिकारी अजय अंबादास देशमुख यांच्यावर शिस्तभंगाची व निलंबनाची कार्यवाही करण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांनी लेखी आदेश दिलेला आहे.

 

आपल्या कर्तव्याचे पालन न करता, गावातील अतिक्रमणास प्रोत्साहन देऊन शासकीय मालमत्तेचे रक्षण न करणाऱ्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांना त्या पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही, तसेच प्रत्येक जागरूक नागरिकाने अशा कर्तव्यात कसूर करणाऱ्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांविरुद्ध टोकाची भूमिका घेणे गरजेचे आहे, असे मत तक्रारकर्ते श्री इमरान पठाण (संस्थापक/अध्यक्ष युवाशक्ती ग्रामविकास संगठन) यांनी व्यक्त केले.

1.5/5 - (2 votes)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 2 2 2 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे