Breaking
अहमदनगरउठ घे मशाल अन्यायाला जाळ खुशालदेश-विदेशपारनेरब्रेकिंगमहाराष्ट्रमुंबईराजकियश्रीगोंदासंवाद विधानसभा

पारनेर तालुक्यातील शिवसेनेच्या सर्वच कार्यकारण्यांची लवकरच पुनर्रचना* — शिवसेना प्रवक्ते संजीव भोर 

याच पार्श्वभूमीवर पारनेर तालुका शिवसेनेमध्येही अनेक ताकतीचे कार्यकर्ते,पदाधिकारी प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. विधानसभा निवडणुकी दरम्यान तत्कालीन तालुकाप्रमुख विकास उर्फ बंडू रोहकले हे वाजत गाजत जाहीरपणे खासदार निलेश लंके यांचे बरोबर गेल्याने तालुक्यातील शिवसेना समर्थकांमध्ये काहीसे संभ्रमाचे वातावरण आहे.अशा परिस्थितीत शिवसेनेच्या तालुक्यातील सर्व कार्यकारण्या सद्यस्थितीत स्थगित आहेत हे याद्वारे स्पष्ट करण्यात येत आहे.

0 2 2 1 9 1

 

*पारनेर तालुक्यातील शिवसेनेच्या सर्वच कार्यकारण्यांची लवकरच पुनर्रचना करणार

शिवसेना प्रवक्ते संजीव भोर 

पारनेर प्रतिनिधी, दि.९ ऑक्टो.२०२४-

शिवसेनेचे मुख्य नेते व माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीने घवघवीत यश मिळविले आहे. तळागाळातील माता भगिनींना दिलासा देणारी लाडकी बहीण योजना एकनाथजी शिंदे यांनी आणली.आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळात शिंदे यांनी जनकल्याणाच्या अनेक योजना आणल्या. आता नवीन सरकारमध्ये एकनाथराव शिंदे यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री पदाची धुरा हातात घेतली आहे. शिंदे यांची सर्वसामान्यांत थेट मिसळून काम करण्याची पद्धत व कार्यकर्त्यांना भक्कम पाठबळ देण्याचं त्यांचं धोरण यामुळे संपूर्ण राज्यात शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते, पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी उत्सुक असल्याचे चित्र आहे.

याच पार्श्वभूमीवर पारनेर तालुका शिवसेनेमध्येही अनेक ताकतीचे कार्यकर्ते,पदाधिकारी प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. विधानसभा निवडणुकी दरम्यान तत्कालीन तालुकाप्रमुख विकास उर्फ बंडू रोहकले हे वाजत गाजत जाहीरपणे खासदार निलेश लंके यांचे बरोबर गेल्याने तालुक्यातील शिवसेना समर्थकांमध्ये काहीसे संभ्रमाचे वातावरण आहे.अशा परिस्थितीत शिवसेनेच्या तालुक्यातील सर्व कार्यकारण्या सद्यस्थितीत स्थगित आहेत हे याद्वारे स्पष्ट करण्यात येत आहे.

पारनेर तालुक्याचे भूमिपुत्र शिवसेनेचे प्रदेश प्रवक्ते संजीव भोर पाटील, जिल्हाप्रमुख अनिलशेठ शिंदे व प्रदेश सचिव संजयजी मोरे समन्वयाने लवकरच पारनेर तालुका शिवसेनेच्या युवासेनेसह सर्व कार्यकारण्यांची पुनर्रचना करणार आहेत.पक्षात येऊ इच्छिणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांनाही सन्मानाने सामावून घेत या पुढील काळात शिवसेनेची अतिशय मजबूत कार्यकारणी करण्यात येईल.आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी पारनेर तालुक्यात पक्षाची मोठी ताकद उभी करून राज्यातील सर्वसामान्य जनतेचे नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी पारनेर तालुका शिवसेना काम करील.

उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत कार्यरत होऊ इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे योग्य ती संधी व सन्मान दिला जाईल असेही यावेळी शिवसेना प्रवक्ते संजीव भोर यांनी सुचित केले आहे. दरम्यान कोणीही उलट सुलट बातम्या देऊन जनतेत गैरसमज पसरवू नये अन्यथा अशा व्यक्तींवर पक्ष शिस्तीनुसार कारवाई करण्यात येईल अशी तंबीही देण्यात आली आहे.

संजीव भोर पाटील, 

     प्रवक्ता, शिवसेना.

1/5 - (1 vote)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 2 1 9 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे