Breaking
अहमदनगरआरोग्य व शिक्षणई-पेपरउठ घे मशाल अन्यायाला जाळ खुशालउपमुख्यमंत्री मा .एकनाथजी शिंदे साहेबकृषी सन्मान पुरस्कारकृषीवार्तागुणवंतांचा सत्कारग्रामपंचायत कारभारब्रेकिंगविशेष निवड

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सौंदाळे ग्रामपंचायत तालुक्यात प्रथम! १५ लाखांच्या बक्षिसाचे मानकरी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान' या स्पर्धात्मक राज्यस्तरीय योजनेत नेवासे तालुक्यातील सौंदाळे ग्रामपंचायतीने उत्कृष्ट कामगिरी करत तालुकास्तरावर प्रथम क्रमांक

0 6 5 3 8 8

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सौंदाळे ग्रामपंचायत तालुक्यात प्रथम! १५ लाखांच्या बक्षिसाचे मानकरी

​नेवासे:(प्रतिनिधी) ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ या स्पर्धात्मक राज्यस्तरीय योजनेत नेवासे तालुक्यातील सौंदाळे ग्रामपंचायतीने उत्कृष्ट कामगिरी करत तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. या घवघवीत यशामुळे सौंदाळेकर तब्बल १५ लाख रुपयांच्या भव्य बक्षिसाचे मानकरी ठरले आहेत. या चुरशीच्या स्पर्धेत तालुक्यातील पुनतगावने द्वितीय, तर शिंगवेतुकाई ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक मिळवला आहे.

​🔹 २२ ग्रामपंचायतींमध्ये होती स्पर्धा; माजलगावच्या पथकाकडून पडताळणी

​या अभियानांतर्गत नेवासे तालुक्यातील एकूण २२ ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता. सहभागी झालेल्या सर्व ग्रामपंचायतींची व त्यांनी केलेल्या विकासकामांची कडक तपासणी माजलगाव (जि. बीड) पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व त्यांच्या विशेष पथकाने प्रत्यक्ष गावांना भेटी देऊन केली होती. गावचे पाणी, रस्ते, स्वच्छता, लोकसहभाग आणि विविध सामाजिक उपक्रम राबवून उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली, ज्याचा निकाल नुकताच जाहीर झाला.

​🔹 सौंदाळेकरांचा एकच जल्लोष

​निकाल जाहीर होताच सौंदाळे गावाने गुलालाची उधळण करत आणि फटाके फोडत एकच जल्लोष केला. तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गावात येऊन सरपंच शरदराव आरगडे, ग्रामविकास अधिकारी प्रतिभा पिसोरे, उपसरपंच आणि सर्व सदस्यांसह ग्रामस्थांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

​🔹 ‘या’ विविध उपक्रमांमुळे मिळाली यशाची दारे खुली:

​सौंदाळे ग्रामपंचायतीने गावात राबवलेले उपक्रम इतर गावांसाठी आदर्श ठरले आहेत. यात प्रामुख्याने खालील कामांचा समावेश आहे:

​जातमुक्त गावासह स्मशानभूमीचे सुंदर सुशोभीकरण.

​आदर्श जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडीची निर्मिती.

​अद्ययावत वाचनालय (ग्रंथालय) आणि पूर्णपणे संगणकीकृत ग्रामपंचायत.

​शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी ‘आरओ’ (RO) फिल्टर प्लांटची उभारणी.

​घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचे उत्कृष्ट नियोजन.

​रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड आणि सार्वजनिक स्वच्छता.

​नागरिकांच्या आरोग्यासाठी श्रमदान आणि विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन.

​💬 महत्त्वाच्या प्रतिक्रिया आणि गौरव:

​”गावाचा एकोपा, ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग आणि ज्येष्ठांचे मार्गदर्शन यांमुळेच हे यश शक्य झाले. उपसरपंच, सर्व सदस्य, आणि ग्रामविकास अधिकारी यांच्या खंबीर साथीने सौंदाळे ग्रामपंचायतीने देशात प्रसिद्ध असलेल्या आपल्या गावाची परंपरा कायम राखत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले.”

– शरदराव आरगडे (लोकलियुक्त सरपंच, सौंदाळे)

​”मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात तालुकास्तरावरील पाहणीत सौंदाळे, पुनतगाव व शिंगवेतुकाई या ग्रामपंचायतींनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावल्याबद्दल या गावच्या ग्रामस्थांचे व सरपंचांचे अभिनंदन. या गावांची प्रेरणा घेऊन तालुक्यातील इतर गावांनीही आपापल्या भागात असेच विविध उपक्रम राबवावेत.”

– शंकरराव गडाख (माजी मंत्री, नेवासे)

​🤝 अधिकाऱ्यांचे व नेत्यांचे लाभले मार्गदर्शन

​ग्रामपंचायतीने आतापर्यंत राबवलेल्या विविध उपक्रमांसाठी व या अभियानात यश मिळवण्यासाठी ज्येष्ठ नेते बाबा आरगडे यांच्यासह पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय लखवाल, सहाय्यक गटविकास अधिकारी कासार आणि विस्तार अधिकारी पाखरे यांचे वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन लाभले.

2/5 - (2 votes)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 5 3 8 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे