लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना अध्यक्षपदी मा.आ.नरेंद्र घुले पाटील तर उपाध्यक्ष पदी काकासाहेब नरवडे पाटील यांची बिनविरोध निवड*
"ज्ञानेश्वरच्या माध्यमातून शेतकरी-कामगारांच्या घरामध्ये लक्ष्मी पोहोचविण्याचे काम होत आहे-मा.आ.नरेंद्र घुले पाटील"


*लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना अध्यक्षपदी मा.आ.नरेंद्र घुले पाटील तर उपाध्यक्ष पदी काकासाहेब नरवडे पाटील यांची बिनविरोध निवड*
“ज्ञानेश्वरच्या माध्यमातून शेतकरी-कामगारांच्या घरामध्ये लक्ष्मी पोहोचविण्याचे काम होत आहे-मा.आ.नरेंद्र घुले पाटील”
भेंडा(वार्ताहर):– येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना अध्यक्षपदी माजी आमदार नरेंद्र मारुतराव घुले पाटील तर उपाध्यक्ष पदी सुधाकर उर्फ काकासाहेब नारायणराव नरवडे पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.
ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून महसूल निर्मिती करून शेतकरी-कामगारांच्या घरामध्ये लक्ष्मी पोहोचविण्याचे काम होत असल्याचे प्रतिपादन नवनिर्वाचित अध्यक्ष माजी आ.नरेंद्र घुले पाटील यांनी केले.
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या २१ जागांची निवडणूक
माजी आमदार नरेंद्र घुले व माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांचे नेतृत्वाखाली दि.१८ जून रोजी बिनविरोध झाली होती.
अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाचे निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांचे अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित संचालकांची सभा मंगळवार दि.३० जून रोजी कारखाना अतिथीगृहात संपन्न झाली. अध्यक्ष पदासाठी माजी आमदार नरेंद्र मारुतराव घुले पाटील व उपाध्यक्ष पदासाठी सुधाकर नारायणराव नरवडे पाटील यांचे एक-एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ही निवड बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी यांनी केली.
यावेळी कारखान्याचे संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील,माजी आमदार पांडुरंग अभंग, राज्य साखर कामगार फेडरेशनचे सरचिटणीस नितीन पवार, संचालक पंडितराव भोसले,डॉ.नारायण म्हस्के,जनार्धन कदम,अशोकराव मिसाळ, मच्छिद्र म्हस्के, बबनराव भुसारी, अड.हिम्मतसिंह देशमुख,अमोल अभंग, विकास नन्नवरे,संतोष पावसे, जनार्दन शेळके, दादासाहेब कोकणे, प्रसाद पटारे, रामनाथ राजपुरे, गोरक्षनाथ भेंडेकर, बाळासाहेब खरड, सौ.सुमनबाई काळे,सौ.रंजना तानवडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी देविदास घोडेचोर, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे,सरव्यवस्थापक रविंद्र मोटे,कामगार संचालक सुखदेव फुलारी उपस्थित होते.
*मा.आ.नरेंद्र घुले पाटील….*
अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बोलताना श्री.घुले पाटील पुढे म्हणाले की,
कारखाना संचालक निवडणुकीसाठी २५० इच्छुकांनी अर्ज भरले होते.मात्र संघटनेवर विश्वास ठेवून अर्ज मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली.
माजी मंत्री शंकरराव गडाख, आमदार विठ्ठलराव लंघे यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते,सभासद यांचे याकामी सहकार्य लाभले. शेतकरी,कामगार-कष्टकऱ्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्याची लोकनेते मारुतराव घुले पाटील साहेबांची परंपरा आहे ती यापुढे ही सुरूच राहील.ज्ञानेश्वर कारखाना ही शेतकरी-कामगारांची कामधेनू आहे.
कारखान्याचे माध्यमातून रचनात्मक कामे होतचराहतील.सर्वांना बरोबर घेऊन काम करू.शरद पवार साहेबांनी चंद्रशेखर घुले पाटलांना कमी वयामध्ये राज्य साखर संघाचे अध्यक्षपदी संधी दिली हीच ज्ञानेश्वरच्या चांगल्या कारभाराची पावती आहे.राज्यातील साखर कारखानदारी मध्ये ज्ञानेश्वरचे नाव आहे असे ही श्री.घुले म्हणाले.
माजी आमदार पांडुरंग अभंग, नवनिर्वाचित उपाध्यक्ष काकासाहेब नरवडे पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडी नंतर सर्व संचालक मंडळाने लोकनेते मारुतराव घुले पाटील स्मृती स्थळावर जाऊन अभिवादन केले.त्यांनतर विविध संस्था व कार्यकर्त्यांच्या वतीने अध्यक्ष-उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवाजीराव भुसारी,विष्णुपंत जगदाळे,सखाराम लव्हाळे, कडूबाळ कर्डिले,
दत्तात्रय काळे,अजित मुरकुटे, बाळासाहेब नवले, डॉ.शिवाजी शिंदे, जनार्दन पटारे, गणेश गव्हाणे, वैभव नवले, अशोक वायकर, मोहनराव गायकवाड, बबनराव धस, योगेश रासने, सुदाम आरगडे, कामगार संघटनेचे सचिव संभाजीराव माळवदे, उपाध्यक्ष संजय राऊत, अण्णासाहेब गर्जे,अंकुश दाभाडे, काकासाहेब लबडे, भानुदास कावरे, हरिभाऊ नजन, अंबादास कळमकर, सचिन फटांगडे, बाळासाहेब मरकड, राहुल बेडके,कडूबाळ घुले, शेषराव दुकळे,
अशोक मेरड, गणेश खंबरे, हनुमंत पातकळ, मंगेश थोरात,
प्रशासकीय अधिकारी कल्याणराव म्हस्के, लीगल ऑफिसर सुनील शिंदे, विलासराव लोखंडे, बाळासाहेब डोहाळे आदी यावेळी उपस्थित होते. .

खबरनामा विश्लेषण
ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्यात संचालक मंडळापासून अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीपर्यंत सर्व प्रक्रिया बिनविरोध पार पडल्याने संस्थेतील संघटनात्मक एकजूट अधोरेखित झाली आहे. आगामी काळात शेतकरी, ऊस उत्पादक, कामगार आणि सभासदांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे मोठे आव्हान नव्या नेतृत्वासमोर असणार आहे.
संचालक पंडितराव भोसले यांनी आभार मानले.




