Breaking
अहमदनगरआरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनजिल्हाधिकारीदेश-विदेशब्रेकिंगवैद्यकीय आरोग्य विभागशेतकरी संघटना महाराष्ट्र राज्यसांस्कृतिक कार्यक्रमस्वातंत्र्य दिनहमीभाव

भानसहिवरे शाळेचा ‘मिशन आरंभ’मध्ये नेवासा तालुक्यात तिसरा क्रमांक* 

शिष्यवृत्ती परीक्षेत सहा विद्यार्थी जिल्हास्तरावर, नऊ तालुकास्तरावर गुणवत्ता यादीत

0 2 2 2 3 3

 

*भानसहिवरे शाळेचा ‘मिशन आरंभ’मध्ये नेवासा तालुक्यात तिसरा क्रमांक

शिष्यवृत्ती परीक्षेत सहा विद्यार्थी जिल्हास्तरावर, नऊ तालुकास्तरावर गुणवत्ता यादीत

 

*नेवासा (प्रतिनिधी)* अहिल्यानगर जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘मिशन आरंभ’ उपक्रमांतर्गत चौथीच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, या परीक्षेत भानसहिवरे जिल्हा परिषद शाळेने नेत्रदीपक यश संपादन करत नेवासा तालुक्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे.

 

या परीक्षेत शाळेचे सहा विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत, तर नऊ विद्यार्थी तालुका गुणवत्ता यादीत झळकले आहेत. याशिवाय मंथन, लक्षवेध व एन.एस.ई. परीक्षेत इयत्ता तिसरीमधील पाच विद्यार्थी आणि इयत्ता पहिलीतील एक विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत.

सदर गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या हस्ते नेवासा येथे करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल नेवासा पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोर जोजार, गटशिक्षणाधिकारी शिवाजीराव कराड, विस्ताराधिकारी रुकसाना शेख, केंद्रप्रमुख सुखदेव सोनवणे, सरपंच मीनाताई जोजार, उपसरपंच व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉ. अशोक भोईटे, डॉ. संतोष ढवाण यांच्यासह ग्रामस्थ व पालकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

 

शाळेच्या भौतिक व बौद्धिक प्रगतीसाठी शुभेच्छा देत, वर्गशिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थ्यांना मिळाल्याचे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले.

 

भानसहिवरे शाळेच्या या घवघवीत यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

1/5 - (1 vote)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 2 2 3 3

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे