दूध दरा संदर्भात आंदोलनात्मक दिशा ठरविण्यासाठी महत्वपूर्ण बैठक – ऍड अजितदादा काळे
सध्या दुधाचे अचानक 3 रु लिटरमागे पडलेले दर आणि शासनाने कबूल केलेले पाच रुपये अनुदान बहुतांश शेतकरी वर्गाला न मिळाल्या कारणाने शनिवार दि 30 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी ठीक दहा वाजता शेतकरी संघटना कार्यालय , कांदा मार्केट जवळ ,श्रीरामपूर येथे महत्वपूर्ण बैठक आयोजित केली असल्याचे शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष एडवोकेट अजित दादा काळे यांनी सांगितले

दूध दरा संदर्भात आंदोलनात्मक दिशा ठरविण्यासाठी महत्वपूर्ण बैठक – ऍड अजितदादा काळे
श्रीरामपूर – सध्या दुधाचे अचानक 3 रु लिटरमागे पडलेले दर आणि शासनाने कबूल केलेले पाच रुपये अनुदान बहुतांश शेतकरी वर्गाला न मिळाल्या कारणाने शनिवार दि 30 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी ठीक दहा वाजता शेतकरी संघटना कार्यालय , कांदा मार्केट जवळ ,श्रीरामपूर येथे महत्वपूर्ण बैठक आयोजित केली असल्याचे शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष एडवोकेट अजित दादा काळे यांनी सांगितले .
दिनांक 25 जून 2024 रोजी हरेगाव फाटा येथे शेतकरी संघटनेने दुध दराच्या प्रश्नाला वाचा फोडून पहिले आंदोलन केले होते . त्यानंतर अनेक ठिकाणी रस्त्यावर शेतकरी वर्ग व दूध उत्पादक उतरला आणि त्याचा परिणाम म्हणून दुधाला तीस रुपये दर आणि पाच रुपये प्रति लिटर अनुदान शासनाने कबूल केले .याचवेळी संपूर्ण राज्यात साडेतीन कोटी लिटर दुधाचे वितरण असून कलेक्शन केवळ दोन कोटी लिटर आहे म्हणजेच मोठ्या प्रमाणावर दूध भेसळीचा उद्योग काही मस्तवाल चिलिंग प्लँट वाल्यांकडून चालू आहेअसे शासनाच्या निदर्शनास शेतकरी संघटनेने आणून दिले .या मोठ्या प्रमाणावर असलेल्या दूध भेसळीबरोबर प्रामाणिक शेतकरी स्पर्धा करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे .यावर कोणत्याही अन्न व भेसळ अधिकारी तथा दुग्धविकास अधिकारी यांचा वचक असल्याचे दिसून येत नाही .हे कनेक्शन भेसळ वाले ते अधिकारी यांच्यापासून सर्व राजकीय पुढाऱ्यांपर्यंत असल्याचे दिसून येते .परंतु तुटपुंज्या अनुदानाची बातमी पसरताच पशुखाद्य मात्र महाग करण्यात आले .
यानंतर विधानसभा निवडणुकींना सामोरे जात असताना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शिष्टमंडळाने दुधाला हमीभाव चाळीस रुपये करण्यासाठी हमीभावाचा कायदा आणण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिल्या कारणाने शेतकरी संघटनेने माननीय एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला . मात्र निवडणुकांचे निकाल बाहेर पडतात ज्या ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचे दिग्गज उमेदवार निवडणुकीत पडले त्या ठिकाणी त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या दूध संस्थांमध्ये तातडीने तीन रुपये लिटर मागे भाव कमी करण्यात आलेले आहेत .तसेच आंदोलनानंतर सहा महिने उलटून देखील बहुतांश शेतकरी पाच रुपये लिटर मागच्या अनुदानापासून वंचित आहे .याबरोबरच काही संस्था चालकांकडे हे अनुदान पशुंना परस्पर दुसरे टॅगिंग करून अनुदानाची अफरातफर झाल्याच्या तक्रारी देखील शेतकरी संघटने कडे प्राप्त झालेल्या आहेत . ही बाब गंभीर असल्या कारणाने या सर्व गोष्टींचा विचार करण्यासाठी आणि पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष एडवोकेट अजित दादा काळे यांच्या नेतृत्वात ही बैठक आयोजित केलेली आहे .
या बैठकीस दूध उत्पादकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष अनिलराव औताडे , जिल्हा उपाध्यक्ष हरि अप्पा तुवर ,युवराज पा जगताप , शरद राव आसने , मेजर अशोक काळे , डॉ रोहीत कुलकर्णी , बाबासाहेब नागोडे , अॅड कावळे , नरेंद्र पा . काळे , सागर गिर्हे , डॉ आदिक , डॉ नवले यांनी केले आहे .