लेखापरीक्षण वेळेत न करणे सोसायटीला पडले महागात*
अध्यक्षांसह व्यवस्थापन समितीवर अपात्रतेची कारवाई लेखापरीक्षण वेळेत न करणे, लेखा परीक्षणाचा व त्यातील दुरुस्तीचा अहवाल निबंधक कार्यालयात सादर न करणे,

नेवासा प्रतिनिधी*लेखापरीक्षण वेळेत न करणे सोसायटीला पडले महागात*
* “`अध्यक्षांसह व्यवस्थापन समितीवर अपात्रतेची कारवाई लेखापरीक्षण वेळेत न करणे, लेखा परीक्षणाचा व त्यातील दुरुस्तीचा अहवाल निबंधक कार्यालयात सादर न करणे,
* “`वार्षिक सर्वसाधारण सभा वेळेवर न घेणे आदी नियमांची पूर्तता न करणे महागात पडले आहे.
“`
* “`महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्याच्या कलम ७५ (४) मधील तरतुदींचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत“`
* “`महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्याच्या कलम ८९ (ए) नुसार चौकशी करण्यासाठी सहकारी अधिकारी यांना अधिकार आहेत
“`
* “`लेखा परीक्षणातील दोष दुरुस्ती अहवाल निबंधक कार्यालयाकडे सादर करत नाही , लेखापरीक्षण मुदतीत केले नव्हते, तसेच त्याचा अहवालही वेळेत सादर केला नव्हता, वार्षिक सर्वसाधारण सभा वेळेवर घेतल्या नाहीत, सभासदांची नोंदवही व यादी ठेवली नाही, कलम ७९ नुसार, आवश्यक विवरणपत्रे सादर केली नाहीत, बँक पासबुक दाखविले नाही,
“`
*नियमांचे पालन आवश्यक*
■ सोसायटीने आर्थिक वर्ष संपल्यावर चार महिन्यांच्या कालावधीत लेखापरीक्षण पूर्ण करून घ्यावे.
■ आर्थिक वर्ष संपल्यावर सहा महिन्यांच्या आत वार्षिक सर्वसाधारण सभा घ्यावी.
■ सोसायटीच्या सभासदांना दिलेल्या कर्जाचे विवरणपत्र, शिल्लक व थकित रकमेचा तपशील वार्षिक सर्वसाधारण सभेत सादर करावा.
■ वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेच्या कामकाजाचा वार्षिक अहवाल, शिल्लक रकमेच्या विनियोगाची योजना, उपविधीत सुधारणा केल्या असल्यास त्यांची सूची, निवडणूक प्रक्रियेची माहिती, मागील आर्थिक वर्षांचा लेखापरीक्षण अहवाल, त्यापूर्वीच्या लेखा परीक्षणातील दुरुस्तीचा अहवाल, पुढील वर्षाचा अर्थसंकल्प सादर करावा
*कलम ७५ (४) काय सांगते ?*
महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा, १९६० च्या कलम ७५ (४) नुसार, सोसायटीचे लेखापरीक्षण करून ताळेबंद, नफा-तोट्याचा हिशोब, कलम ८१ नुसार नियुक्त लेखा परीक्षकाने सादर केलेला मागील आर्थिक वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल, त्यातील दोष दुरुस्तीचा अहवाल आणि समितीचा अहवाल स्वीकृतीसाठी वार्षिक सर्वसाधारण सभेत ठेवणे आवश्यक आहे. त्यानंतर कलम ७५ (५) नुसार बैठक बोलावून सर्व नियमांचे पालन करणे व्यवस्थापन समितीचे कर्तव्य आहे.
त्याचे उल्लंघन झाल्यास व्यवस्थापन समितीच्या सदस्यांवर अपात्रतेची कारवाई केली जाते.
*Dipak Pachpute*
*AHILYA NAGAR*