महाकाल येथे सहाशे ग्रॅम सुमारे 75 हजार रुपये किमतीचा चांदीचा मुकुट आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते अर्पण करून नवस पुर्ती करण्यातआली*
विधानसभा निवडणूकीत आमदार मोनिका राजळे यांच्या हॅट्रिक विजयासाठी शेवगाव येथील महाकाल ग्रुपच्या वतीने कुलदिप फडके यांच्या वतीने उज्जैन महाकाल येथे सहाशे ग्रॅम सुमारे 75 हजार रुपये किमतीचा चांदीचा मुकुट आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते अर्पण करून नवस पुर्ती करण्यातआली*

*विधानसभा निवडणूकीत आमदार मोनिका राजळे यांच्या हॅट्रिक विजयासाठी शेवगाव येथील महाकाल ग्रुपच्या वतीने कुलदिप फडके यांच्या वतीने उज्जैन महाकाल येथे सहाशे ग्रॅम सुमारे 75 हजार रुपये किमतीचा चांदीचा मुकुट आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते अर्पण करून नवस पुर्ती करण्यातआली*
शेवगाव (प्रतिनिधी){ अविनाश देशमुख)
ता. 02 मार्च 2025 रविवार शेवगाव ~ या बाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव विधानसभा निवडणूकीत आमदार मोनिका राजळे यांच्या विजयासाठी शेवगाव येथील महाकाल ग्रुपच्या वतीने कुलदिप फडके यांच्या वतीने उज्जैन महाकाल येथे सहाशे ग्रॅम चांदीचा मुकुट आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते अर्पण करून नवस पुर्ती करण्यात आली.
सविस्तर वृत्त कि शेवगाव विधानसभा निवडणूकी दरम्यान शेवगाव येथील महाकाल ग्रुपचे कुलदीप फडके यांनी उज्जैन महाकाल येथे गणेश रांधवणे, किरण पुरनाळे,सनी क्षीरसागर,अभि कबाडी यांच्या समवेत आमदार मोनिका राजळे यांच्या तिस-यांदा विजयासाठी सहाशे ग्रॅम चांदीचा मुकुट अर्पण करण्याचा नवस केला होता. या नवस पुर्ती साठी आमदार मोनिका राजळे ,कुलदीप फडके, महेश फलके,गणेश रांधवणे किरण पुरनाळे,सोमनाथ आधाट, सनी क्षीरसागर,अभि कबाडी,सागर फडके मित्र परिवार यांच्या सह उज्जैन महाकाल येथे उपस्थित राहून महाकाल चरणी चांदीचा मुकुट अर्पण करून नवस पुर्ती करण्यात, आली
*ताजा कलम*
*गेल्या पंधरा दिवसांपासून शेवगांव शहरासह तालुक्यात राज्य महामार्गापासून शासकीय जागेतील 50 मीटर पर्यंतचे अतिक्रमणे काढण्याची मोहीम त्याविरोधात उपोषण आंदोलन सुरु असताना तालुक्याचे विद्यमान आमदार आणि त्यांना सुमारे लाखभर मत देऊन विजयी करणारे त्यांचे समर्थक आजुन विजय त्याचा उत्सव नवस फेड यातच मश्गुल असुन जुन्या काळात फ्रांस शहर जळत असताना तिथला राजा महालात फिड्ल वाजवत होता अशी चर्चा शेवगांव शहरासह तालुक्यात आहे. वास्तविक तालुक्याचे प्रतिनिधी म्हणुन टपरीधारकांच्या मागे खंबीरपणे उभे राहणे क्रमप्राप्त होते*
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*