Breaking
ई-पेपरदेवगड देवस्थान गुरुवर्य भास्करगिरी महाराजनेवासा तालुकाब्रेकिंगवारकरी संप्रदाय वार्तावारकरी सांप्रदायविशेष निवडशेतकरी

श्री क्षेत्र देवगड येथे गुरुवर्य भास्करगिरी महाराज सप्ताह उत्सवाला भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अहिल्यानगर जिल्ह्यातील पवित्र श्री क्षेत्र देवगड, ता. नेवासा येथे श्री दत्त मंदिर संस्थानच्या वतीने गुरुवर्य भास्करगिरी महाराज सप्ताह उत्सवाचे आयोजन

0 6 4 1 2 2

श्री क्षेत्र देवगड येथे गुरुवर्य भास्करगिरी महाराज सप्ताह उत्सवाला भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नेवासा प्रतिनिधी(देवगड)अहिल्यानगर जिल्ह्यातील पवित्र श्री क्षेत्र देवगड, ता. नेवासा येथे श्री दत्त मंदिर संस्थानच्या वतीने गुरुवर्य भास्करगिरी महाराज सप्ताह उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून पंचक्रोशीतील गावांमधून भाविकांचा मोठ्या श्रद्धेने सहभाग लाभत आहे. सप्ताह काळात विविध गावांतील सेवाभावी भाविक, ग्रामस्थ मंडळे आणि अन्नदाते यांच्या माध्यमातून सकाळ-संध्याकाळ माऊली प्रसाद सेवा तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

२१ मे २०२६ (गुरुवार)

सकाळच्या अन्नदान सेवेसाठी आमदार श्री. विठ्ठलराव पा. लंघे (शिरसगांव), श्री. बबनराव पा. पिसोटे (देवसडे), श्री. शिवाजीराव पा. मते (बकुपिंपळगांव) यांनी सेवा दिली.

संध्याकाळी श्री ग्रामस्थ मंडळ गिडेगांव व शिरसगांव यांनी माऊली प्रसाद सेवा आयोजित केली.

२२ मे २०२६ (शुक्रवार)

सकाळच्या सेवेसाठी श्री. विलास पा. आगळे (प्रवरासंगम), श्री. बाळासाहेब पा. भागवत (भालगांव), श्री. भाऊसाहेब पा. आहेर (चिंचबन) यांनी अन्नदान सेवा केली.

संध्याकाळी श्री ग्रामस्थ मंडळ गोपाळपूर व खामगांव नं. ३ यांनी भक्तांसाठी प्रसाद सेवा दिली.

२३ मे २०२६ (शनिवार)

सकाळच्या सेवेमध्ये श्री. वसंतराव पा. विधाते (बाभूळखेडा), श्री. नानासाहेब पा. विधाते (बाभूळखेडा), श्री. अशोकराव पा. लबडे (बकुपिंपळगांव) यांनी सहभाग घेतला.

संध्याकाळी श्री ग्रामस्थ मंडळ वाकडी व पिंप्रीशहाली यांनी सेवा अर्पण केली.

२४ मे २०२६ (रविवार)

सकाळच्या अन्नदान सेवेसाठी श्री. गणेश पा. वरखडे (मुरमे), श्री. दगडू पा. सुकाळकर (सर) (वाटापूर), श्री. कैलास पा. फोपसे (तामसवाडी) यांनी सहभाग घेतला.

संध्याकाळी श्री ग्रामस्थ मंडळ रामडोह व चिकणी खामगांव यांनी भक्तांसाठी माऊली प्रसादाचे आयोजन केले.

२५ मे २०२६ (सोमवार)

सकाळच्या सेवेसाठी श्री. धोंडीरामजी सर्जे (वरखेड), श्री. दिगंबरराव देशमुख (भाऊसाहेब) (ढोरजळगांव), श्री. शुभम पा. आगळे (खामगांव नं. १) यांनी अन्नदान सेवा केली.

संध्याकाळी श्री ग्रामस्थ मंडळ पान रांजणगांव व शेंदुरवादा यांनी प्रसाद सेवा आयोजित केली.

२६ मे २०२६ (मंगळवार)

सकाळच्या सेवेमध्ये श्री. सुभाषराव पा. भदगले (उस्थळदुमाला), श्री. प्रशांत पा. तनपुरे (भालगांव), श्री. कैलास पा. बोडखे (बागडी) यांनी सहभाग घेतला.

संध्याकाळी श्री ग्रामस्थ मंडळ भिवधानोरा व गळनिंब यांनी भक्तांसाठी सेवा दिली.

२७ मे २०२६ (बुधवार – एकादशी फराळ)

सकाळच्या एकादशी फराळ सेवेसाठी श्री. मा. आ. पांडुरंगजी अभंग (कुकाणा), श्री. मा. सभापती भाऊसाहेब पा. पटारे (भानसहिवरा), श्री. पांडुरंग पा. निपुंगे (नेवासा फाटा) यांनी सेवा अर्पण केली.

संध्याकाळी श्री ग्रामस्थ मंडळ गोगलगांव, खेडले काजळी आणि मंगळापूर यांनी एकादशी फराळ सेवा आयोजित केली.

काला महाप्रसाद – २८ मे २०२६ (गुरुवार)

महाप्रसादासाठी श्री. बाळासाहेब पाटील (माळेवाडी खालसा), श्री. नामदेव पा. मोरे (मुंबई), श्री. दत्तात्रय पा. लबडे (श्रीरामपूर), श्री. गहिनीनाथ पा. सकुंडे (दहिगांव-ने), श्री. शहादेव पा. आव्हाड (जांभळी), डॉ. जयराम पा. पाव्हणे (गंगापूर), श्री. राजेंद्र पा. हुमे (महालगांव), श्री. नामदेव पा. वाघ (वाघवाडी) यांनी देणगी स्वरूपात योगदान दिले आहे.

वारकरी संप्रदायाची सेवा, भक्ती आणि अन्नदानाची परंपरा जपत हा सप्ताह उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न होत असून हजारो भाविक महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. हरिनाम सप्ताह, भजन-कीर्तन आणि माऊली प्रसादामुळे संपूर्ण परिसरात आध्यात्मिक ऊर्जा अनुभवायला मिळत आहे.

महत्त्वाचे आवाहन

╔════════════════════════════════╗

📢 विशेष आवाहन – वाकडी पंचक्रोशी 📢

वाकडी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांना विनंती करण्यात येते की,

गुरुवर्य भास्करगिरी महाराज सप्ताह उत्सवानिमित्त दिलेल्या तारखेप्रमाणे भाकरी जमा कराव्यात व अन्नदान सेवेमध्ये सहभागी व्हावे.

वाकडी विजयी हनुमान मंदिर या ठिकाणी भाकरी जमा करण्यात यावे गावकऱ्यांनी संपर्कासाठी दादासाहेब काळे नारायण काळे आणि दिलीप काळे वार शनिवार वेळ १२ ते १ वाजे  पर्यंत जमा करावे

वारकरी परंपरेतील सेवा, भक्ती आणि अन्नदानाचा महिमा जपत सर्वांनी उत्स्फूर्त सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

╚════════════════════════════════╝

श्री क्षेत्र देवगड संस्थानच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे की, “श्री क्षेत्र देवगड संस्थानच्या नावावर कुणालाही वर्गणी अगर धान्य देऊ नये.”

 

स्थळ: श्री दत्त मंदिर संस्थान, श्री क्षेत्र देवगड, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर.

मार्गदर्शक: श्री गुरूदास भास्करगिरी गुरु किसनगिरीबाबा.

1.5/5 - (2 votes)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 4 1 2 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे