Breaking
अहमदनगरउठ घे मशाल अन्यायाला जाळ खुशालकायदा आणि प्रशासनतहसीलपंचनामापारनेरपोलीस स्टेशन नेवासाब्रेकिंगभ्रष्टाचार आणि लाच लुचपतमहाराष्ट्रमाहिती अधिकार 2005मुंबईसहकारी पतसंस्था

वराळ पतसंस्थेने ठेवीदारांचा विश्वासघात केल्याचा खटला चालवा….!

तेरा संचालकांना पारनेर न्यायालयाच्या नोटीसा

0 2 2 2 0 6

 

वराळ पतसंस्थेने ठेवीदारांचा विश्वासघात केल्याचा खटला चालवा….!

( तेरा संचालकांना पारनेर न्यायालयाच्या नोटीसा )

पारनेर : तालुक्यातील निघोज येथील सहकार महर्षी किसनराव वराळ पाटील पतसंस्थेच्या संचालक मंडळा विरुद्ध ठेवीदारांचा संगनमताने विश्वासघात केल्याचा ठपका ठेवत संचालक

मंडळा विरुद्ध फौजदारी खटलाचा चालविण्याचे आदेश पारनेर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश राहुल देशपांडे यांनी दिले आहेत. म्हस्केवाडी येथील निवृत्ती पळसकर या ठेवीदाराच्या ठेवी अहमदनगर येथील ग्राहक न्यायालयाने व्याजासह परत करण्याचे आदेश देऊनही वराळ पाटील पतसंस्थेने त्यांना ठेव रकमा परत केल्या नाहीत, म्हणून त्यांनी पारनेर येथील न्यायालयाकडे वराळ पाटील पतसंस्थेच्या संचालकांनी त्यांचा विश्वासघात करून फसवणूक केल्याची खाजगी फिर्याद दाखल केली होती. पारनेर न्यायालयाने पळसकर यांच्या फिर्यादीची दखल घेऊन तक्रारीची पूर्ण पडताळणी केल्यानंतर या प्रकरणात वराळ पाटील पतसंस्थेचे ठेवीदार पळसकर यांचा संस्थेच्या तेरा संचालकांनी संगनमताने विश्वासघात करून फसवणूक केल्याचा निष्कर्ष काढला. या दोषी संचालकां विरोधात फौजदारी खटला पारनेर न्यायालयासमोर चालविण्याचे आदेश दिले आहेत.

याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष रंगनाथ वराळ, विलास हारदे, गोरक्ष ढवन, रामदास वराळ, रंगनाथ गायकवाड, शंकर कवाद, बाबाजी वाघमारे, सुनंदा जाधव, लक्ष्मी लाळगे, दिलीप कवडे, अर्जुन चासकर, राहुल औटी या संचालकांना न्यायालयाने नोटीसा बजावल्या असून अठरा डिसेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. ठेवीदार निवृत्ती पळसकर यांच्यातर्फे अँड रामदास घावटे, अँड. उन्मेश चौधरी यांनी न्यायालयासमोर बाजू मांडली.

 

प्रेस नोट –

निवृती पळसकर

9822327610

दि. 27.11.2024

 

सोबत –

पारनेर न्यायालयाचा दि.25.11.2024 चा आदेश

1/5 - (1 vote)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 2 2 0 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे