नेवासा तालुका शेतकरी संघटनेची मागणी: सक्तीची वसुली थांबवा*
शेतकरी कर्जमुक्ती अभियान विधी तज्ञ माननीय अजित काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत लवकरच पुणे येथे दिनांक १९.३.२०२५ रोजी सकाळी साडेनऊ वाजता आयुक्तालयाला घेराव घालण्यात येणार आहे.*

नेवासा तालुका शेतकरी संघटनेची मागणी: सक्तीची वसुली थांबवा*
*नेवासा* – नेवासा तालुका शेतकरी संघटनेने जिल्हा सहकारी बँक, विविध सोसायट्या, पतसंस्था तसेच इतर वित्तीय संस्थांकडून सुरू असलेली सक्तीची कर्ज वसुली त्वरित थांबविण्याची मागणी केली आहे. संघटनेने जप्तीचे आदेश त्वरित थांबविण्याचेही आवाहन केले आहे. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत कठीण असून, ऊसाचे अद्याप पूर्ण पेमेंटही झालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर होणारा आर्थिक ताण वाढत चालला आहे.
शेतकऱ्यांचे कर्ज फेडण्याची स्थिती नाही. कारण, शेतीमालास हमीभाव मिळत नाही. अनेक शेतकऱ्यांनी मागील पिढीपासून घेतलेले कर्ज अद्याप फेडायचे आहे, तर काही शेतकऱ्यांना नव्याने कर्ज घ्यावे लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांची स्थिती अधिक बिकट होत चालली आहे. याशिवाय, मुलांचे शिक्षण, विवाह तसेच इतर कौटुंबिक खर्च पाहता शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे.
शासनाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे संपूर्ण पैसे तत्काळ मिळतील याची हमी घ्यावी. तसेच, शेतकऱ्यांना आधारभूत किंमतीच्या आधारावर शेतीमाल विक्रीसाठी योग्य व्यवस्था करून द्यावी. अन्यथा, शेतकरी संघटनेकडून तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
शेतकरी संघटनेने राज्य सरकारला तसेच जिल्हा सहकारी बँक आणि इतर वित्तीय संस्थांना निवेदन दिले असून, शेतकऱ्यांवरील सक्तीची वसुली थांबवावी आणि त्यांना आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
*शेतकरी कर्जमुक्ती अभियान विधी तज्ञ माननीय अजित काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत लवकरच पुणे येथे दिनांक १९.३.२०२५ रोजी सकाळी साडेनऊ वाजता आयुक्तालयाला घेराव घालण्यात येणार आहे.* त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी सक्तीच्या वसुलीला विरोध दर्शवण्यासाठी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकरी संघटना या विषयाचा धागा पकडून सक्तीच्या वसुलीचा तीव्र विरोध करणार आहे.
शेतकरी संघटनेची तालुकाधक्ष अशोक मेजर काळे व शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी यांची मागणी यावेळी कायदेशीर सल्लागार यांनी निवेदन तयार करून प्रशासनाला कळवले आहे.
निवेदन सह्या करणारी पदाधिकारी नेवासा तालुका शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष अशोक मेजर काळे
शेतकरी युवा तालुका आघाडी तालुका अध्यक्ष डॉक्टर रोहित कुलकर्णी
उपाध्यक्ष बाबासाहेब नागवडे
प्रसिद्धी प्रमुख नरेंद्र पाटील काळे संपर्कप्रमुख विश्वास मते तालुका संघटक भाऊसाहेब शिवाजी काळे उर्फ ठाकरे
किरण लंघे, दादासाहेब नाबदे , सोमनाथ आवटी
दत्तू पाटील निकम
कायदेशीर सल्लागार अडवोकेट कावळे वकील व इतर शाखाध्यक्ष