विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार
राज्यांमध्ये दसऱ्यानंतर लगेच विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे निवडणुकीची घोषणा ही येतात 13 ऑक्टोबर नंतर होण्याची शक्यता आहे
नेवासा (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य सर्वत्र राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीसाठी उत्सुक आहेत त्यामुळे प्रचाराचा धुराळा देखील उडायला सुरुवात झाली आहे. आता राज्यांमध्ये दसऱ्यानंतर लगेच विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. निवडणुकीची घोषणा ही येतात 13 ऑक्टोबर नंतर होण्याची शक्यता आहे .आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांची जोरदार तयारी सुरू झाली आहे .राज्यांमध्ये ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या सभा बैठका आणि चर्चांचा सत्र वाढत चालला आहे येत्या 8 ऑक्टोबरला हरियाणा आणि जम्मू-काश्मीर निवडणुकीचे निकाल लागण्याची शक्यता असून त्यानंतर महाराष्ट्राच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल असं जाणकरांचा अंदाज आहे. दिनांक 10 ऑक्टोबर हरियाणा जन्म काश्मीर निवडणूक कार्यक्रम संपणार आहे . नियमानुसार एक निवडणूक कार्यक्रम संपण्यापूर्वी दुसऱ्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करता येत नाही दरम्यानच्या काळात निवडणूक आयोगाला तयारी करावी लागते. 13 ऑक्टोबरला रविवार आहे 14 तारखेनंतर सोनवऱ्या ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात आचारसंहितेची घोषणा होण्याची शक्यता आहे त्यामुळे आता सर्व राजकीय पक्षांची तयारी सुरू झाली आहे महाविकास आघाडीची जागा वाटपाची बोलणी अंतिम टप्प्यामध्ये आली आहे मुंबईच्या काही जागावर महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच आहे मात्र चर्चा सुरूच असून हा तिडा सुटण्याच्या मार्गावर आहे माहिती राज्यामध्ये पहिल्यांदाच एकत्रित निवडणुका विधानसभा लढत आहे महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाही दोन वेळा महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत.
तसेच नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे त्यामुळे आता राज्यांमध्ये राजकारण जोरदार रंगले असून दिल्ली दौर वाढले आहेत. प्रचारासाठी यात्रा काढल्या जात आहेत.
नरेंद्र पाटील काळे