शेती महामंडळाच्या हरेगाव मळ्यातील ब्लॉक नंबर ३९ व हरेगाव मळ्यातील इतर आकारिपडीत सर्वे नंबर असलेली शेतजमीन ई टेंडर पद्धतीने त्रयस्थ व्यक्ती किंवा संस्थेस करार पद्धतीने कसावयास देऊ नये
ऑनलाईन पद्धतीने शेती महामंडळाने करावयाचे ठरवले असून तशा आशयाचे टेंडर ऑनलाईन उपलब्ध झालेले आहे म्हणून ९ गावे अकारिपडित संघर्ष समितीच्या वतीने शेतकरी संघटनेचे माननीय अॅड अजित दादा काळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली नऊ गावातील सर्व अकारि पिडित शेतकऱ्यांच्या वतीने शासनास निवेदन दिलेले आहे स
माळवाडगाव (वार्ताहर) शेती महामंडळाच्या हरेगाव मळ्यातील ब्लॉक नंबर ३९ व हरेगाव मळ्यातील इतर आकारिपडीत सर्वे नंबर असलेली शेतजमीन ई टेंडर पद्धतीने त्रयस्थ व्यक्ती किंवा संस्थेस करार पद्धतीने कसावयास देऊ नये अशा आशयाचे निवेदन अकारि पडीत संघर्ष समितीच्या वतीने आज माननीय प्रांत साहेब ,तहसीलदार साहेब तसेच तालुका पोलीस स्टेशन श्रीरामपूर व हरेगाव मळा स्थावर व्यवस्थापक यांना देण्यात आले आहे याचे कारण म्हणजे हरेगाव मळ्यातील मौजे ब्राह्मणगाव वेताळ शिवारातील ब्लॉक नंबर ३९ मधील शेत जमिनीचे ई टेंडरिंग ऑनलाईन पद्धतीने शेती महामंडळाने करावयाचे ठरवले असून तशा आशयाचे टेंडर ऑनलाईन उपलब्ध झालेले आहे म्हणून ९ गावे अकारिपडित संघर्ष समितीच्या वतीने
शेतकरी संघटनेचे माननीय अॅड अजित दादा काळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली नऊ गावातील सर्व अकारि पिडित शेतकऱ्यांच्या वतीने शासनास निवेदन दिलेले आहे सदर निवेदनात पुढे म्हटले आहे की १४ ऑगस्ट २०२४रोजी माननीय उच्च न्यायालयाच्या (औरंगाबाद )संभाजीनगर खंडपीठाने शासनाला जमीन वाटपा संबंधित कायदा तयार करण्यास सांगून सदर जमिनी लाभ धारक शेतकऱ्यांना वाटण्यास सांगितले आहे त्यासंबंधी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठराव देखील संमत झाला आहे तरी देखील शेती महामंडळाचे आडमुठे धोरणामुळे ई-टेंडरिंग पद्धत राबवण्याचा घाट घातला जात आहे .हा उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान आहे तरी समिती च्या वतीने अवमान याचिका दाखल केली जाणार आहे. शेती महामंडळाच्या निर्णया विरोधात नऊ गावे अकारिपडित संघर्ष समितीच्या वतीने आंदोलनाच्या माध्यमातून तीव्र विरोध करण्याचे समितीने ठरवलेले आहे एवढे करूनही शेती महामंडळाने सदर जमिनी ई टेंडर पद्धतीने धनदांडग्या लोकांच्या किंवा संस्थेच्या स्वाधीन केल्या तर टेंडर धारक व्यक्तींना किंवा संस्थेला अकारिपडीत सर्वे नंबर असलेल्या शेत जमिनीत पाऊल ठेवून न देण्याचा निर्धार अकारिपडित शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आलेला आहे सदर निवेदनावर शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे अध्यक्ष शरद आसने, सचिन वेताळ विठ्ठलराव शेळके ,बबनराव वेताळ ,बापूसाहेब गोरे ,सोपानराव नाईकसर ,सुनील आसने, गंगाधर वेताळ,गोरख वेताळ, बाबासाहेब वेताळ ,अॅड सर्जेराव घोडे, निलेश तोडमल प्रदिप गलांडे ,जितेंद्र चांदगुडे दिपक थोरात विशाल सोनार ज्ञानदेव निघुन रघुनाथ चव्हाण आदींच्या सह्या आहेत