महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाध्यक्ष माननीय पाशा पटेल यांना अनावृत्तपत्र. एडवोकेट अजित काळे व डॉक्टर अशोकराव ढगे नेवासा जिल्हा अहिल्यानगर
आदरणीय पाशा पटेल साहेब अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोग सादर प्रणाम महाराष्ट्रामध्ये दररोज किमान दहा शेतकरी आत्महत्या करत आहेत

खबरनामा न्यूज संपादक नरेंद्र काळे
आदरणीय पाशा पटेल साहेब अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोग सादर प्रणाम महाराष्ट्रामध्ये दररोज किमान दहा शेतकरी आत्महत्या करत आहेत ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे या संदर्भात आपणास विनंती करतो की आपण महाराष्ट्र राज्य सरकारला कृती आराखडा शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सादर करावा ही नम्र प्रार्थना १. किमान आधारभूत किंमत एम एस पी याला कायदेशीर संरक्षण मिळावे २. महाराष्ट्रामध्ये धान्य साठवणुकीसाठी सरकारी गोदामे आधुनिक पद्धतीने बांधावीत ३. शेतमालाच्या खरेदीसाठी उदाहरणार्थ सोयाबीन तूर गहू कपाशी खरेदी केंद्रे सरकार मार्फत मोठ्या प्रमाणात उभी करावीत ४ या देशांमध्ये भाजीपाल्याचे भाव ठरविण्यासाठी कुठलीही यंत्रणा नाही ती उभी करावी ५. बँकांमार्फत शेतकऱ्यांना त्यांच्या एकूण अर्थव्यवहाराच्या 18% रक्कम कर्ज म्हणून देण्यात येण्यास कायदा असला तरी फक्त अकरा टक्के रक्कम कर्ज वितरणासाठी एकूण अर्थव्यवहारापैकी वापरले जाते ती वाढवलीच पाहिजे ६. पाणी हा शेतीचा महत्त्वाचा घटक आहे राष्ट्रीय संपत्ती पाणी आहे त्याची संवर्धन होण्यासाठी उपाययोजना झाल्या पाहिजेत ७. शेतकरी संरक्षण व संवर्धन कायदा आला पाहिजे शेती प्रश्नांचा गुंता वाढत आह