भंडारदरा धरणाच्या पाण्यास विलंब – शेतकऱ्यांमध्ये चिंता!* .. शेतकरी संघटना व केळी उत्पादक संघटना
भंडारदरा धरणाचे पाणी 8 फेब्रुवारी रोजी सोडण्यात येणार असल्याचे आश्वासन मिळाले होते. मात्र, आता पाणी सोडण्याचा निर्णय 12 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आला असून, अद्यापही पाणी सोडण्याबाबत अनिश्चितता आहे. यामुळे बेलपिंपळगाव, पाचेगाव, पुणदगाव, बेलपांढरी, टाकळीभान, भोकर, श्रीरामपूर ते नेवासा या भागातील शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता व्यक्त होत आहे.

*भंडारदरा धरणाच्या पाण्यास विलंब – शेतकऱ्यांमध्ये चिंता!* .. शेतकरी संघटना व केळी उत्पादक संघटना
*नेवासा, अहमदनगर:* भंडारदरा धरणाचे पाणी 8 फेब्रुवारी रोजी सोडण्यात येणार असल्याचे आश्वासन मिळाले होते. मात्र, आता पाणी सोडण्याचा निर्णय 12 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आला असून, अद्यापही पाणी सोडण्याबाबत अनिश्चितता आहे. यामुळे बेलपिंपळगाव, पाचेगाव, पुणदगाव, बेलपांढरी, टाकळीभान, भोकर, श्रीरामपूर ते नेवासा या भागातील शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता व्यक्त होत आहे.
रब्बी हंगामासाठी हे पाणी अत्यंत महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गहू, हरभरा, वाटाणा, तसेच केळी बागायती केली आहे. सध्याच्या परिस्थितीत पाणी न मिळाल्यास या पिकांचे मोठे नुकसान होईल. शेतकऱ्यांचे लग्नकार्य, साखरपुडा, धार्मिक कार्यक्रम नियोजित असताना शेतीतील उत्पन्नावर याचा परिणाम होईल.
*आत्महत्येची भीती!*
काही शेतकऱ्यांनी शेतीसाठी मोठे कर्ज काढले आहे. पाणी वेळेवर न मिळाल्यास संपूर्ण हंगाम वाया जाऊ शकतो. यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नाही, अशी भीती व्यक्त होत आहे.
*शासनाने तातडीने लक्ष द्यावे!*
माती फाउंडेशन व केळी बागायतदार संघ, महाराष्ट्र राज्य बेलपिंपळगाव (ता. नेवासा) यांच्यासह शेतकऱ्यांनी तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक संघ संचालक गुलाबभाई पापाभाई पठाण यांनी प्रशासनाला आवाहन करताना सांगितले की, “शेतकऱ्यांसाठी ही जीवन-मरणाची परिस्थिती आहे. शासनाने त्वरित पाणी सोडावे अन्यथा आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही.”
शासन व प्रशासन यावर काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
आमच्या प्रतिनिधी बोलताना त्यांनीही आपली भावना व्यक्त केली.