डॉ.बापुसाहेब नागरगोजे जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा निबंधक जन्म व मृत्यू जिल्हा परिषद,अहिल्यानगर यांचे आदेश
ज्ञानमाता सेवाभावी संस्था संचलित माहिती अधिकार नागरी समूह जिल्हाध्यक्ष दिपक पाचपुते यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने आदेश

*अहिल्यानगर तालुका प्रतिनिधी:*
डॉ.बापुसाहेब नागरगोजे जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा निबंधक जन्म व मृत्यू जिल्हा परिषद,अहिल्यानगर यांचे आदेश
ज्ञानमाता सेवाभावी संस्था संचलित माहिती अधिकार नागरी समूह जिल्हाध्यक्ष दिपक पाचपुते यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने आदेश
महाराष्ट्रातील सर्व भागास महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी अधिनियम,१९९८ य महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी नियम,१९९९ लागू आहे.संदर्भ क्र.१अन्वये श्री दिपक पाचपुते, टाकळी काझी, तालुका नगर, जिल्हा अहिल्या नगर यांच्या प्राप्त तक्रार अर्जात नमूद केले नुसार विवाह नोंदणी दाखला विषयी बाबत अहिल्या नगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यामधील बऱ्याच ग्रामपंचायत कार्यालयामध्ये विवाह दाखल्यासाठी वेगवेगळ्या नियमावली स्वतः तेथील लोकसेवकांनी बनवली असून सदर नियमावलींचा वापर केला जात असल्याचे नमूद केले आहे.तसेच लग्नपत्रिका असताना सुद्धा १०० रुपये (Bond Paper Stamp) ग्रामपंचायत कार्यालयामार्फत मागितले जातात.
तरी या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व अधिनस्त निबंधकांना या कार्यालयामार्फत सूचित करण्यात येते कि,विवाह नोंदणी करताना संदर्भ क्र.२अन्वये मा. संचालक आरोग्य सेवा तथा निबंधक विवाह (राज्यस्तर) महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील प्राप्त परिपत्रकातील मार्गदर्शक सुचनांनुसार आपले स्तरावरून योग्य त्या कार्यपद्धतीचा अवलंब करावा.
तसेच गटविकास अधिकारी यांनी या परिपत्रकाची प्रत अधिनस्त सर्व ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत यांना आपले स्तरावरून निर्गमित करावी.
आपण केलेल्या कार्यवाही बाबत या कार्यालयास अवगत करावे असे डॉक्टर बापूसाहेब नागरगोजे यांनी आदेशात नमूद केले आहे.
*कृपया वरील वृत्त आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रामध्ये प्रकाशित करून आम्हाला सहकार्य करावे ही विनंती.*