ऊस दर आणि दुध दर प्रश्नी ऍड अजितदादा काळे घेणार गंभीर भुमिका – डॉ रोहीत कुलकर्णी
निवडणुकीची धामधूम शांत झाल्यानंतर समस्त शेतकरी वर्गाला व दूध उत्पादकांना ऊस दर व दूध दराचा प्रश्न भेडसावू लागलेला आहे .सन 2023 - 24 या गळीत हंगामाच्या वर्षामध्ये नगर जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांनी 2700 ते 2800 रुपये भावाने बोळवण केलेली आहे . तर ज्या ज्या ठिकाणी दिग्गज उमेदवार पडले त्यांच्याशी संलग्न दुध संस्थांचे दर तातडीने 3 रु ने खाली आणण्यात आले .

ऊस दर आणि दुध दर प्रश्नी ऍड अजितदादा काळे घेणार गंभीर भुमिका – डॉ रोहीत कुलकर्णी
===================
नेवासा प्रतिनिधी निवडणुकीची धामधूम शांत झाल्यानंतर समस्त शेतकरी वर्गाला व दूध उत्पादकांना ऊस दर व दूध दराचा प्रश्न भेडसावू लागलेला आहे .सन 2023 – 24 या गळीत हंगामाच्या वर्षामध्ये नगर जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांनी 2700 ते 2800 रुपये भावाने बोळवण केलेली आहे . तर ज्या ज्या ठिकाणी दिग्गज उमेदवार पडले त्यांच्याशी संलग्न दुध संस्थांचे दर तातडीने 3 रु ने खाली आणण्यात आले .
शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ऍड अजितदादा काळे यांनी विधानसभेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेला केवळ शेतकरी हिताचे मुद्दे त्यांनी दर्शविल्याने पाठींबा दिलेला आहे . आता महायुतीचे सरकार सत्तेत आल्याने महायुतीच्या आमदारांना सोबत घेवून दूध व ऊसाचा प्रश्न ऐरणीवर आणण्यात येणार आहे .
ऍड अजितदादा काळे यांची भुमिका केवळ शेतकरी हित पाहण्याचीच असते . यामध्ये समोर पक्ष कोणताही असला तरी संघर्षाची भुमिका त्यांची अटळ असते हे सर्वपक्षीय नेते जाणून आहेत .
महाराष्ट्रातील एफ आर पी काढ
तांना यापूर्वीच 9.25 % वरून 10. 25 % रिकव्हरी करून अप्रत्यक्ष एफ आर पी कमी करण्यात आलेली आहे . सन 2024 -25 मध्ये देखील एफ आर पी मध्ये केवळ 8 % वाढ करून 225 रु प्रति टन अशी नाममात्र वाढ केंद्र सरकारने केलेली आहे . वास्तविक शेणखत , रासायनीक खत, मशागती , मजुरी, डिझेल अशा सर्व साधनांची महागाई वाढलेली असतांना हि वाढ तुटपुंजी आहे . राज्य सरकारने केंद्राला केलेल्या उत्पादन खर्चाच्या तरतुदी सोयीस्कर रित्या केंद्राकडून डावलल्या जात आहेत . याबरोबरच ऊसापासून होणाऱ्या ज्युसचे बी हेवी व सी हेवी मधील रूपांतरास देखील केंद्राचा प्रतिबंध आहे . त्याद्वारे इथनॉल निर्मितीवर देखील निर्बंध टाकले जातात . साखरेचे दर स्थिर ठेवण्याच्या गोंडस नावाखाली पडक्या भावात साखर विक्री व्हावी म्हणून साखर विक्रीच्या कोट्यावर देखील बंधने केंद्र सरकारची असतात .
याचा अर्थ असा नाही कि साखर कारखाने केवळ केंद्र सरकारच्या उदासीन धोरणांमुळे ऊसाला दर देवू शकत नाहीत तर या निमित्ताने अजून डांगोरा पिटून साखर कारखानदार उपपदार्थांच्या उत्पन्नात अफरातफरी करण्यात यशस्वी होत आहेत .
आज महाराष्ट्रातील बहुतांश कारखान्यांकडे इथेनॉल निर्मिती , रेक्टिफाईड स्पिरिट , सहविज निर्मिती , अल्कोहोल निर्मिती , बगॅस व इतर उपपदार्थाची निर्मितीची व्यवस्था आहे . यापैकी किती कारखानदारांनी जरा तरी प्रामाणिकपणे उपपदार्थांचा हिशेब देवून ऊस दर दिलेले आहेत ?
सी रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार 70 : 30 च्या फॉर्म्युल्याने साखरेचे उत्पन्न अधिक उपपदार्थांचे उत्पन यांची गोळाबेरीज करून 70% पैसे ऊस उत्पादकाला तर 30% पैसे साखर कारखान्यांच्या व्यवस्थापनेसाठी ठेवणे क्रमप्राप्त आहे . खरोखरच हा आजच्या सर्व दरांनी हिशेब केला तर एक टन ऊसापासून 6500 ते 7000 रु उत्पन मिळत आहे . 70 :30 च्या मान्यताप्राप्त फॉर्मुल्यानुसार 4500 ते 5000 रु प्रतिटन ऊसाला भाव मिळू शकतो . परंतु केवळ साखरेच्या दराचे निमित्त करून ऊस उत्पादकांची दिशाभूल केली जात आहे . सन 2024–25 मध्ये देखील जाहीर केलेल्या 3400 रु प्रतिटन एफ आर पी मधून तोड वाहतूक वजा केल्यास केवळ 2800 रू प्रतिटन उचल मिळण्याची शक्यता दिसत आहे . वाहतुक देखील कार्य क्षेत्रातील ऊसापेक्षा लांबचे अंतरावरील ऊस गाळून वाढीव वाहतूक दर एफ आर पी मधून वजा केले जात आहेत . या पार्श्वभूमीवर पक्ष गट तट यांची तमा न ठेवता ऍड अजितदादा काळे यांनी आता कारखानदारांविरोधात रणशिग फुंकले आहेत .
याबरोबरच विधानसभेत पराभूत उमेदवारांनी अचानक 3 रु लिटरमागे दूध दर पाडलेले आहेत .
25 जुन 2024 रोजी हरेगांव फाटा श्रीरामपूर येथे प्रथमत दूध दरासाठी शेतकरी संघटनेने एल्गार पुकारले . ते वादळ राज्यभर पसरवून 22 रु लिटरचे भाव 30 रू लिटर आणि 5 रु शासकीय अनुदान पदरात पाडून घेण्यात शेतकरी संघटना यशस्वी झाली . परंतु सहा महिने उलटत आले तरी बहुतांश दुध उत्पादक अनुदानापासून वंचित आहेत . वास्तविकपणे मा . एकनाथजी शिंदे यांच्या शिष्टमंडळाने ऍड अजितदादा काळे यांना दुधासाठी 40 रु हमीभावाचा कायदा करू असे आश्वासन दिलेले आहे . आता सत्ताधारी पक्षांमध्ये शिवसेनेचा महत्वपूर्ण वाटा असाल्याने दुध दराचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे .
या दोन्ही ऊरु व दुध दराच्या समस्येसाठी ऍड अजितदादा काळे हे सत्ताधारी अथवा विरोधी पक्ष यामध्ये भेदाभेद न करता रोखठोक भुमिका घेवून आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे नेवासा तालुका युवाध्यक्ष डॉ रोहीत कुलकर्णी यांनी सांगितले .