Breaking
ई-पेपरउठ घे मशाल अन्यायाला जाळ खुशालकायदा आणि प्रशासनकृषी कायदाकृषीवार्तागुन्हेगारीजिल्हा सहकारी बँक अहमदनगरजिल्हाधिकारीतहसीलतहसीलदार नेवासादेश-विदेशनेवासापंचनामापोलीस स्टेशनब्रेकिंगमहाराष्ट्रमाहिती अधिकार 2005मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यमुंबईराजकियशेतकरी आंदोलनशेतकरी विरोधी कायदेस्वातंत्र्य दिनहमीभावहुकूमशाही

पिक कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर कारवाई करा

नेवासा आम आदमी पार्टीचा आंदोलनाचा इशारा : शासन आदेशाची पायमल्ली करुन बँकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक

0 2 6 4 8 9

 

पिक कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर कारवाई करा

नेवासा आम आदमी पार्टीचा आंदोलनाचा इशारा : शासन आदेशाची पायमल्ली करुन बँकांकडून शेतकऱ्यांची अडवणू

नेवासा (प्रतिनिधी) – राज्य सरकारचा आदेश डावलून सी बील पाहून शेतकऱ्यांना पिक कर्ज नाकारुन अडवणूक करणाऱ्या तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकांवर कठोर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आम आदमी पार्टीने दिला आहे.

 

यासंदर्भात आम आदमी पार्टीने नेवासा तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिक कर्जाची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची सी बिल स्कोअरच्या नावाखाली राष्ट्रीकृत बँकांनी अडवणूक करु नये अशी तंबी राज्य सरकारने दिली असून तसे करणाऱ्या बँकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. मात्र तरीही तालुक्यातील बहुतांश राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांतून सी बील स्कोअरचे कारण देऊन शेतकऱ्यांना सर्रास पिक कर्ज नाकारण्यात येत असल्याच्या गंभीर तक्रारी वाढल्या आहेत. ही बाब गंभीर असून सरकारी आदेशाची पायमल्ली करणारी आहे. पिक कर्ज मिळणे हा शेतकऱ्यांचा हक्क असताना त्यांना यापासून वंचित ठेवण्याचा हा अन्याय्य प्रकार आहे. राष्ट्रीकृत बँका पिक कर्ज नाकारत असल्याने हतबल बनलेल्या शेतकऱ्यांवर नाईलाजाने खाजगी सावकारांचे उंबरठे झिजवण्याची दुर्दैवी वेळ ओढवली आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास तालुक्यातील बहुतांश शेतकरी खाजगी सावकारांच्या दुष्टचक्रात गुरफटून भविष्यात त्यांच्यावर कर्जबाजारीपणापायी आत्महत्येची दुर्दैवी वेळ ओढवण्याची भीती ‘आप’ने व्यक्त केली आहे.

 

तालुक्यातील सर्वच राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखाधिकाऱ्यांना शासन आदेशाचे पालन करुन सी बील स्कोअरच्या नावाखाली शेतकऱ्यांची अडवणूक न करता त्यांना पिक कर्जाचे तातडीने वितरण करण्याचे आदेश करण्याची मागणी ‘आप’ने या निवेदनाद्वारे केली असून येत्या आठ दिवसांत तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांतून शेतकऱ्यांचे सी बील न पाहता त्यांना पिक कर्जाचे वितरण सुरळीत न झाल्यास संबंधित बँकांच्या शाखांमध्ये संबंधित वंचित शेतकऱ्यांसह जाऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. नेवासा आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष अॅड. सादिक शिलेदार, सचिव प्रवीण तिरोडकर, उपाध्यक्ष देवराम सरोदे, अण्णासाहेब लोंढे, किरण भालेराव, शहराध्यक्ष संदीप आलवणे, अल्पसंख्यांक आघाडीचे सलीम सय्यद, विठ्ठल मैंदाड, करीम सय्यद, विठ्ठल चांडे, समित पटारे, मुन्नाभाई आतार, राजू महानोर आदींच्या सह्या आहेत. नायब तहसीलदार चांगदेव बोरुडे यांनी निवेदन स्विकारले.

1/5 - (1 vote)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 6 4 8 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे