Breaking
ई-पेपरनेवासानेवासा तालुकानेवासा तालुका काँग्रेस पक्षब्रेकिंगमहाराष्ट्रमुंबईविशेष निवड

नेवासा तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी अण्णासाहेब पटारे यांची फेरनिवड

संघटन सृजन अभियानांतर्गत प्रदेश काँग्रेसचा निर्णय; कार्यकर्त्यांशी चर्चेनंतर सर्वानुमते निवड

0 7 0 0 0 4

नेवासा तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी अण्णासाहेब पटारे यांची फेरनिवड

संघटन सृजन अभियानांतर्गत प्रदेश काँग्रेसचा निर्णय; कार्यकर्त्यांशी चर्चेनंतर सर्वानुमते निवड

 

नेवासा : संघटन सृजन अभियानांतर्गत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निरीक्षकांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला भेट देऊन जिल्ह्यातील काँग्रेस नेते, माजी महसूलमंत्री व काँग्रेस वर्किंग कमिटी सदस्य बाळासाहेब थोरात यांच्या समवेत तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी व तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांशी चर्चा करून सर्वानुमते नेवासा तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ काँग्रेस नेते अण्णासाहेब पटारे यांची शिफारस करण्यात आली होती. ती शिफारस लक्षात घेता प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार नेवासा ब्लॉक अध्यक्षपदी अण्णासाहेब पटारे यांची नियुक्ती करण्यात आली.

प्रदेश कार्यालयातील वरिष्ठ उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील यांनी दि. १७/०७/२०२६ रोजी ही नियुक्ती जाहीर केली. अण्णासाहेब पटारे हे नेवासा तालुक्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते असून ते नेवासा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत. तसेच अनेक वर्षे ते तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक राहिले असून सुरेगाव गंगा गावचे अनेक वर्षे सरपंचपदही त्यांनी भूषविले आहे.

 

अण्णासाहेब पटारे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे विश्वासू असून ते माजी मंत्री शंकरराव गडाख यांचेही निकटवर्तीय आहेत. तालुक्यात काँग्रेसचे संघटन अधिक मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी निवडीनंतर सांगितले. पटारे यांनी युवक काँग्रेसचेही अनेक वर्षे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. तालुक्यातील पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी गावोगावी शाखा तसेच बूथ अध्यक्षांच्या नियुक्तींवर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रत्येक बूथवर बीएलए-२च्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

 

अण्णासाहेब पटारे यांच्या निवडीबद्दल माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजीत तांबे, माजी मंत्री शंकरराव गडाख, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार हेमंत ओगले, नगराध्यक्ष करण ससाणे, जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, दक्षिण जिल्हाध्यक्ष किरण पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अभिजीत लुणिया आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

1/5 - (1 vote)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 0 0 0 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे