Breaking
अहमदनगरउठ घे मशाल अन्यायाला जाळ खुशालकायदा आणि प्रशासनकृषीवार्ताजयंती राष्ट्रीय पुरुषांचीनेवासा तालुकामहाराष्ट्रमुंबईशेतकरी विरोधी कायदेशेतकरी संघटना महाराष्ट्र राज्यसहकारी पतसंस्थासहकारी साखर कारखानास्वातंत्र्य दिनहुकूमशाही

*जे का रंजले गांजले । त्यासि म्हणे जो आपुलें ॥ तोचि साधु ओळखावा । देव तेथेंचि जाणावा* *स्वर्गिय शरद जोशी साहेब* …

0 2 2 2 1 9

*जे का रंजले गांजले । त्यासि म्हणे जो आपुलें ॥ तोचि साधु ओळखावा । देव तेथेंचि जाणावा* *स्वर्गिय शरद जोशी साहेब* …

 

नेवासा (प्रतिनिधी) आज स्वर्गिय शरद जोशी साहेबांचा नववा पुण्यस्मरण दिन .

संपूर्ण आयुष्य शेतकरी व्यथा आणि देशातील गरिबी निर्मुलनासाठी अथक प्रयत्न केलेला युगात्मा !

स्वर्गिय शरद जोशी साहेबांचा जन्म 3 सप्टेबर 1935 रोजी सातारा येथे झाला . वडिल श्री अनंत नारायण जोशी व आई इंदिरा अनंत जोशी . मागील पाच पिढ्या तरी शेतीचा संबंध नसलेल्या युगात्म्याने आर्थिक निरक्षर शेतकऱ्याला अर्थिक साक्षर करून त्याच्या पारतंत्र्याची जाणीव करून दिली . त्याला रस्त्यावर व न्यायालयात लढायला शिकविले . जोशी साहेब शेतकऱ्यांच्या जातीचे नसले तरी कोणत्या मातीतून तयार झाले हा संशोधनाचाच विषय आहे . आणि जे जे आम्ही शेतकरी पुत्र आहोत असे सांगत राज्य करीत आले त्यांनीच शेतकऱ्यांच्या उरावर बसून त्यांना भिकेला लावले हि वस्तुस्थिती नाकारता येणार नाही .

संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकरी संघटनेचे कार्य करीत असतांना अहिल्यानगर जिल्ह्याची जबाबदारी स्वर्गिय बबनराव काळे साहेबांकडे सोपविली . स्व . काळे साहेबांनी देखील जोशी साहेबांच्या खांद्याला खांदा लावून संघर्ष केला. जोशी साहेबांनी ऊसाची झोनबंदी उठविली तर काळे साहेबांनी साखर कारखानदाराना व्हाऊचर ऑडिट ऐवजी मार्केट कॉस्ट ऑडिट करण्यास सांगून जेरीस आणले . जोशी साहेबांनतर काळे साहेबांनी शेतमालाच्या भावाची लढाई चालूच ठेवली . शेतमालाच्या रास्त भावाकरीता त्यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना दिल्ली येथे राष्ट्रपती भवन येथे भेट घेवून साकडे घातले . ऊसाची झोनबंदी ते ऊसाची एम एस पी अथवा एफ आर पी व उपपदार्थांचे अर्थकारण ह्या दोन्ही नेत्यांनी चर्चेत आणून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला .

    स्व .जोशी साहेबांनी स्व . बबनराव काळे साहेबांच्या बँकिंग क्षेत्राचा अनुभव लक्षात घेवून त्यांना शेतकऱ्यांसाठी वित्तीय पुरवठ्या विषयी अभ्यास करण्यास सांगितले . त्यावर काळे साहेबांनी शेतकऱ्यांना देण्यात येणारे पिक कर्ज हे रास्त उत्पादन खर्च धरून न काढल्याने अपुरा वित्त पुरवठा असल्याचे निष्कर्ष दिले . त्या बरोबरच अवाजवी व्याज दर असल्याचे निदर्शनास आणले . इतर राष्ट्रांप्रमाणे शेतीला विहीर , पाईपलाईन , ठिबक , ट्रॅक्टर , जमिन लेव्हलिंग , फळबागा , वाहतुक व्यवस्था , साठवणुकीच्या व्यवस्था अशा सर्व दिर्घमुदतीच्या कर्जांना किमान 30 ते 40 वर्षांच्या परतफेडीचा कालावधी असावा असे त्यांचे स्पष्ट मत होते .

स्व . शरद जोशी साहेबांनी भारत विरुद्ध इंडिया हा संघर्ष मांडला . त्या माध्यमातून शहरी मध्यमवर्गीय अर्थव्यवस्था जपण्यासाठी शेतकर्‍याचे केलेले शोषण सिद्ध केले . शरद जोशी हे केवळ शेतकरी शोषणा विरोधात काम करीत होते हि संकल्पना चुकीची आहे . कारण त्यांनी संपूर्ण भारताच्या गरीबीचे अर्थकारण शोधून त्यांची लढाई अर्थिक स्वातंत्र्याबरोबर गरिबी निर्मुलना साठी होती .

देशातील गरीबी हटवायची असेल तर *सरकारने सरकार म्हणून दुसरे तिसरे काहीही करू नये तर सरकार गरिबाच्या छाताडावर बसलेले आहे तेवढे त्यांनी उठावे* हा कानमंत्र दिला .

डंकेल प्रस्ताव व उदारिकरण याबद्दल जोशी साहेब प्रचंड अभ्यासू व आग्रही होते . भारताने उदारीकरण स्विकारावे असे त्यांचे स्पष्ट मत होते . त्यावेळी काही स्वदेशी उद्योजकांचे मांडलिक असलेल्या लोकांनी त्यांना परकीय गुंतवणूकदारांचे एजन्ट म्हणून देखील हिणविले . परंतु जोशी साहेबांचा शब्द आणि शब्द खरा झाला . आपल्या भारत देशाला जागतिकीकरण स्विकारावेच लागले .

जागतिकीकरणानंतर अनेक क्षेत्रात सकारात्मक बदल होत आले . परंतु कृषिक्षेत्रात कायद्यांच्या बेड्या अडकवून जाणिव पूर्वक उदारिकरण येवू दिले नाही . त्याचा परिणाम म्हणून आजपर्यंत पाच लाखाहून जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत .

जोशी साहेबांनी कधीही शेतमालाला भाव मागितलेला नाही तर केवळ शेतकऱ्याच्या अर्थकारणातील सरकारी हस्तक्षेप दूर करावेत व त्याला तंत्रज्ञान , बाजारपेठेचे स्वातंत्र्य द्यावे हि भुमिका त्यांनी मांडली . सुट सबसिडीचे राजकारण त्यांना नको होते . खतांवर मिळणाऱ्या अनुदानाला सुद्धा त्यांचा विरोधच होता . त्यांनी नारा दिला

*भिक नको*

*हवेत घामाचे दाम*

*इडा पिडा टळू दे*

*बळीचे राज्य येवू दे*

स्वित्झर्लंड सारख्या देशातील 1970 मध्ये असलेली आय पी एस मधील उच्च पदस्थ नोकरी झुगारून स्वतःच्या कुटुंबासह भारतात परतले . शेतकरी संघटनेची स्थापना केली . शेतकऱ्याला कानाकोपऱ्यात जावून त्यांनी अर्थिक साक्षर केले . यामध्ये स्वतःच्या कुटुंबाची वाताहत कधी झाली हे त्यांना कळलेच नाही . या महात्म्याच्या मुलीला काश्मीरच्या सहलीला जाण्यासाठी केवळ 500 रु देखील शिल्लक नव्हते . त्या काळात आपल्या किमान सात पिढ्या कश्या खातील असा विचार करून राजकारण करणारे राजकारणी त्यावेळेसही होतेच . परंत स्व . जोशीसाहेबाच्या पायाच्या नखाची सुद्धा सर त्यांना नाही .

*कुठे हा युगात्मा आणि कुठे हे स्वतःला भुमिपुत्र म्हणवून घेवून शेतकऱ्याचे लचके तोडणारे पांढरे बगळे* ! 

केवळ समाजकारण करून शेतकऱ्याला न्याय मिळणे अवघड आहे हे उमजल्याने त्यांनी स्वतंत्र भारत पक्षाची स्थापना केली . कारण व्यवस्थेत आल्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीत हि त्यांची धारणा झाली . परंतु शेतकऱ्याच्या हिताचे असून देखील केवळ जातीचे नसल्याने लाखोंनी आंदोलनाला गर्दी करणाऱ्यांनी जोशी साहेबांना मतपेटीत कधीच घेतले नाही . त्यानंतर आजतागायत शेतकरी संघटनेच्या उमेदवारांना मतपेटीत प्राध्यान्य देण्याची भुमिका शेतकऱ्यांची नाही . कारण गुलामाला गुलामीच आवडते . स्वातंत्र्य आवडत नाही .

*ज्या दिवशी शेतमालाला रास्त भाव मिळेल त्या दिवशी मी शेतकरी संघटना बंद करेल आणि तो दिवस माझ्याकरीत सुवर्णक्षण असेल* !

 हे उद्‌गार ह्या महात्म्यांचे .

दुर्देवाने आज नववा स्मृतीदिन असून देखील आजही शेतमालाच्या भावाचा , कर्जाचा , वीजेचा , आयात निर्यात धोरणांचा , तंत्रज्ञानाचा , बाजारपेठेचा आणि एकूणच शेतकरी स्वातंत्र्याचा प्रश्न अनुत्तरीतच आहे .

यापुढे ज्यांनी ह्या स्व . शरद जोशी व स्व . बबनराव काळे यांच्या संघर्षाची ज्योत पुढे कायम ठेवली असे स्व . बबनराव काळे यांचे सुपुत्र ऍड अजितदादा काळे यांच्या नेतृत्वात भविष्यात लढा देणे हिच खरी स्व .शरद जोशी साहेबांना आदरांजली ठरेल !

डॉ रोहीत कुलकर्णी 

युवाध्यक्ष 

नेवासा तालुका शेतकरी संघटना

1/5 - (1 vote)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 2 2 1 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे