शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत रास्त मिळणे आवश्यक*
अॅड अजितदादा काळे* कारवाडी (पाचेगाव ) - शेतकऱ्यांना सर्व शेतीमालाला किमान आधारभूत किंमत रास्त मिळणे आवश्यक आहे आणि त्यासाठी हमीभावाचा कायदा करणे निकडीचे आहे असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष एडवोकेट अजित दादा काळे यांनी कारवाडी पाचेगाव येथील बैठकीत केले

*शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत रास्त मिळणे आवश्यक*
*अॅड अजितदादा काळे*
कारवाडी (पाचेगाव ) -नेवासा प्रतिनिधी
शेतकऱ्यांना सर्व शेतीमालाला किमान आधारभूत किंमत रास्त मिळणे आवश्यक आहे आणि त्यासाठी हमीभावाचा कायदा करणे निकडीचे आहे असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष एडवोकेट अजित दादा काळे यांनी कारवाडी पाचेगाव येथील बैठकीत केले .
याप्रसंगी अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे जुने कार्यकर्ते जगू भाऊ तुवर होते .एडवोकेट अजितदादा काळे म्हणाले की गेल्या अनेक वर्षात कोणत्याही शेतमालाच्या आधारभूत किमतीमध्ये अपेक्षित दरवाढ झालेली नाही .याबरोबरच सरकारच्या आयात निर्यातीच्या धोरणात देखील सुसूत्रता नाही .याचा फटका परिणामी शेतकऱ्यांना बसून संपूर्ण ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था खिळखिळी झालेली आहे .पंजाब हरियाणा सीमेवर चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाकडे गंभीरपणे सरकारने बघण्याची गरज असल्याची त्यांनी सांगितले .याबरोबरच दुधाला चाळीस रुपये हमीभाव मिळण्यासाठी कायदा पास करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी सर्व आमदारांना आम्ही पत्र दिलेले आहे असेही त्यांनी सांगितले .शेतकरी संघटनेने जून महिन्यात केलेल्या दुधाच्या आंदोलनानंतर यशस्वीपणे 22 रुपये प्रति लिटरचा भाव 30 रुपये प्रति लिटर अधिक पाच रुपये अनुदान मिळवण्यात शेतकरी संघटना यशस्वी झालेली आहे .याबरोबरच शेतकरी संघटना वीज प्रश्न , पिकविमा प्रश्न व कर्जमाफी या मुद्द्यांवर देखील भर देत आहे .परंतु यासाठी शेतकऱ्यांचे भरीव संघटन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले .
यावेळी सरपंच वामनराव तुवर यांनी घरकुलाच्या गावठाण प्रश्नसंदर्भात एडवोकेट अजित दादा काळे यांच्याशी चर्चा केली .सदर बैठकीत शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष हरी अप्पा तुवर तालुकाध्यक्ष मेजर अशोक काळे, तालुका युवा अध्यक्ष डॉ रोहित कुलकर्णी , साहेबराव पवार दिलीपराव पवार , प्रकाशराव जाधव यांची भाषणे झाली .
याप्रसंगी अडवोकेट कावळे
बाबासाहेब नागोडे
मेजर अशोक काळे
भास्कर तुवर
सुधा भाऊ तुवर
कार्लस साठे सर
अजित तुवर
कैलास पवार
गंगारामजी तुवर
बाजीराव कोळसे
म य मतकर
दिलीप दहे
हरिभाऊ जगताप
सुनिल शिंगोटे
निलेश फुगे
जसिम शेख
वसिम शेख
निसारभाई शेख
योगेश थिटे
चंदुकाका हिरवे
गणेश घोगरे
किरण पंडीत
राधाकृष्ण सुरोसे
प्रल्हाद जगताप
लक्षमण माकोणे
दादा पा . होन
कैलास शिंगोटे
अशोक सुरोसे
हबीबभाई शेख
मुजीबभाई शेख
संतोष बोरुडे
संतोष शिंदे
राहुल तुवर
दत्तु सावंत
गोरख पंडित
बाळासाहेब जगताप
बादशाह भाई बेग
राजु भाईशेख
गोकुळ तुवर
अभिषेक शिंगोटे
बाबासाहेब थिटे
अतुल शिंगोटे
रहेमानभाई शेख
दि मान्यवरांसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते .