शेतकऱ्यांपाठोपाठ महायुती सरकारवर लाडक्या बहिणींकडून पणं फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची राज्यातील पहिली तक्रार श्रीरामपूर पोलीस स्टेशन येथे दाखल*
राज्यातील शेतकऱ्यांपाठोपाठ आता लाडक्या बहिणीकडून पणं फसवणुकीचे गुन्हे दाखल, श्रीरामपूर

*शेतकऱ्यांपाठोपाठ महायुती सरकारवर लाडक्या बहिणींकडून पणं फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची राज्यातील पहिली तक्रार श्रीरामपूर पोलीस स्टेशन येथे
श्रीरामपूर प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांपाठोपाठ आता लाडक्या बहिणीकडून पणं फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याची तक्रार दाखल. महायुती सरकारने लाडक्या बहिणींची फसवणूक करून विश्वासघात केला त्या विरुद्ध श्रीरामपूर पोलीस स्टेशन येथे महायुतीचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार,एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची तक्रार केली आहे .महायुती सरकारने निवडणुकीत राज्यातील लाडक्या बहिणींना आश्वासन दिलं की त्यांना 2100 रु दर महिना अनुदान देऊ पणं निवडून सत्तेत येताच महायुतीने 2100 रु तर नाहीच दिले पणं किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकरी महिलांचे 1500 रु अनुदानही बंद केले आता फक्त 500 रु प्रती महिना देण्याचे जाहीर केले आहे म्हणजेच लाडक्या बहिणींना 2100 पणं नाही 1500 पणं नाही आता 500 रु देऊन आमची फसवणूक केली आहे अशी तक्रार शेतकरी महिला श्रीमती सुनीताताई वानखेडे ,सौ कोमल वानखेडे यांनी महायुती शासनविरुद्ध श्रीरामपूर पोलीस स्टेशन येथे संघटित गुन्हेगारीने ,फसवणुककरून विश्वासघात केल्याचे गुन्हा दाखल करण्याची तक्रार केली आहे .
यावेळी कर्जदार शेतकरी श्री नवनाथ दिघे,श्री प्रकाश जाधव,श्री. श्रीराम त्रिवेदी यांनी पण फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याच्या तक्रारी केल्या आहेत .
श्रीरामपूर पोलिसांनी गुन्हे दाखल न केल्यास शेतकरी संघटनेचे नेतृत्वाखाली राज्यभरातील शेतकरी व लाडक्या बहिणी 5 मे रोजी संभाजीनगर हायकोर्टात शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ऍड.श्री अजित काळे यांचे मार्फत फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यासाठी याचिका दाखल करण्यात येणार आहे.
या प्रसंगी स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटना अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष श्री नीलेश शेडगे ,बाळासाहेब घोगरे,रवी वानखेडे,नारायण काकड आदीसह शेतकरी महिला व शेतकरी तक्रार दाखल करण्यासाठी उपस्थित होते .