*तुर हमीभाव केद्रे चालू करण्यास विलंब का* ? *ऍड अजित काळे*
तुरीचे उत्पादन चालू होऊन दोन महिने लोटून गेलेले आहेत .तरी देखील अद्याप पर्यंत तुर हमीभाव खरेदी केंद्रे उघडण्यात आलेली नाहीत . या मागचे नेमके कारण काय ? असा प्रश्न शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष एडवोकेट अजित

*तुर हमीभाव केद्रे चालू करण्यास विलंब का* ?
*ऍड अजित काळे*
नेवासा – तुरीचे उत्पादन चालू होऊन दोन महिने लोटून गेलेले आहेत .तरी देखील अद्याप पर्यंत तुर हमीभाव खरेदी केंद्रे उघडण्यात आलेली नाहीत . या मागचे नेमके कारण काय ? असा प्रश्न शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष एडवोकेट अजित दादा काळे यांनी उपस्थित केलेला आहे .
आजवरचा अनुभव पाहता सोयाबीनचे देखील हमीभाव केंद्रे उशिरा उघडण्यात आले .सोयाबीन उत्पादन चालू झाल्यापासून ते हमीभाव केंद्र उघडेपर्यंत जो मधला कालावधी आहे त्या कालावधीमध्ये 3500 पासून 3900 रुपये पर्यंत व्यापारी सोयाबीन खरेदी करत होते .नंतर ते सोयाबीन हमीभाव केंद्रांना वेगवेगळे उतारे जोडून 4890 रुपये भावाने देण्यात अनेक व्यापारी यशस्वी झालेली आहेत .यावर व्यापाऱ्यांना खरेदी करण्यास संधी मिळावी म्हणून मधला काळात विलंब केला जातो .
सुमारे चार ते पाच वर्षांपूर्वी शंभर रुपये किलो असताना मोझेबीक सारख्या देशांमध्ये करार करून शासनाने तुरीची आयात सुरू ठेवलेली आहे .याबरोबरच पिवळ्यां वाटाण्या सारख्या डाळींची आयात करून आपाल्या देशातील डाळींचे भाव पाडण्यात शासन यशस्वी झाले आहे . यामुळे 100 रु किलो असणारी तुर आता 60 रु किलो झालेली आहे . शेतकरी आत्मनिर्भर करण्याच्या गोंडस नावाखाली सातत्याने चाललेली हि लूट आहे .
शासनाला खरोखरच एम एस पी देऊन आधारभूत किमतीने शेतकरी सक्षम करायचा असेल तर एनसीसीपी सारख्या शेतमाल खरेदी करणाऱ्या कंपनीला उत्पादन चालू झाल्यापासून त्वरित परवाना देणे काय अवघडआहे ?परंतु जाणीवपूर्वक हा विलंब केला जातो आणि फार मोठ्या भ्रष्टाचाराची साखळी यामध्ये आहे .ही साखळी मोडण्यासाठी सर्व घटकांनी म्हणजे शेतकरी, लोकप्रतिनिधी ,विरोधी पक्षाचे प्रतिनिधी यांनी एकजुटीने हा प्रश्न ऐरणीवर आणणे गरजेचे आहे . मात्र कोणाचाही सहभाग या व्यवस्थेला विरोध करण्यात दिसून येत नाही .शेतकरी संघटना मात्र यावर गप्प बसणार नाही .लवकरात लवकर तूर हमीभाव केंद्रे चालू करावेत याकरिता शेतकरी संघटनेचे शासन स्तरावर प्रयत्न चालू आहेत .यामध्ये असणारा गैरव्यवहार लक्षात आल्यास शेतकरी संघटना सक्षमपणे तो उघड करेल असे एडवोकेट अजितदादा काळे यांनी काल नेवासा येथील जनता दरबारात सांगितले .