टाकळीभान येथील शिवम गायकवाड यांची जिल्हा उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क पदावर निवड – प्रदेश उपाध्यक्ष अजित काळे
टाकळीभान येथील भूमिपुत्र शिवम संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या राज्यसेवा २०२३ परीक्षेत घवघवीत यश संपादन करत जिल्हा उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (DySP, State Excise) या पदावर आपली नियुक्ती निश्चित केली आहे.

टाकळीभान येथील शिवम गायकवाड यांची जिल्हा उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क पदावर निवड – प्रदेश उपाध्यक्ष अजित काळे यांच्याकडून अभिनंदन
टाकळीभान (ता. श्रीरामपूर): टाकळीभान येथील भूमिपुत्र शिवम संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या राज्यसेवा २०२३ परीक्षेत घवघवीत यश संपादन करत जिल्हा उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (DySP, State Excise) या पदावर आपली नियुक्ती निश्चित केली आहे.
शिवम यांनी आपल्या कष्ट, चिकाटी आणि सातत्याच्या अभ्यासाच्या जोरावर ही यशाची शिखर गाठली. प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा टाकळीभान, माध्यमिक शिक्षण श्री समर्थ विद्या मंदिर वडाळा बहिरोबा, तर उच्च शिक्षण भालगाव महाविद्यालयात पूर्ण केल्यानंतर त्यांनी २०२० पासून UPSC व MPSC परीक्षांची तयारी सुरू केली होती. त्यांच्या अथक मेहनतीला यश लाभत त्यांनी राज्यसेवा २०२३ मध्ये जिल्हा उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क या पदावर आपली निवड सुनिश्चित केली.
या गौरवप्रसंगी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष मा. अजित काळे साहेब यांनी शिवम गायकवाड यांचे खास अभिनंदन करताना सांगितले की, “शिवम यांचे यश हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल. त्यांच्या कार्यकुशलतेमुळे प्रशासनात नवा आत्मविश्वास निर्माण होईल.”
तसेच, श्रीरामपूर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष हेमंत आहेर, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब गांगुर्डे, माजी सभापती बाबासाहेब भालसिंगे, कार्याध्यक्ष सचिन देशमुख, सुदर्शन वाकचौरे, दिलीप गवारे, विजय गायकवाड, सागर वाकचौरे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
गावातील ग्रामस्थ, शिक्षक, मित्रपरिवार, नातेवाईक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी शिवमच्या यशाचे स्वागत करत त्याचा सत्कार करण्याची तयारी सुरू केली आहे. गावाच्या इतिहासात ही निवड सर्वाधिक प्रतिष्ठेची मानली जात आहे.
—
💐 ‘ न्यूज’ तर्फे शिवम गायकवाड यांचे मन:पूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी
शुभेच्छा! 💐