Breaking
आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनई-पेपरउठ घे मशाल अन्यायाला जाळ खुशालऔषधी वनस्पती विभाग महाराष्ट्र शासनजिल्हाधिकारीदेश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्रमाहिती अधिकार 2005मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यमुंबईलाच लुचपत आणि भ्रष्टाचारवन्य प्राणी आणि संरक्षण होते शेतकऱ्यांचा भक्षनविज्ञान आणि वैज्ञानिक शास्त्रज्ञविशेष निवडस्पर्धा परीक्षा महाराष्ट्र शासनस्पर्धा परीक्षेत यश 2025स्वातंत्र्य दिन

MPSC द्वारे FDA विभागात औषध निरीक्षक भरतीची घोषणा – 1.32 लाख पगारासह सुवर्णसंधी

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक अत्यंत आनंददायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) राज्य शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागात (Food and Drug Administration) औषध निरीक्षक (गट-B) पदांसाठी 109 रिक्त पदांची अधिकृत भरती अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

0 6 2 0 6 1

MPSC द्वारे FDA विभागात औषध निरीक्षक भरतीची घोषणा – 1.32 लाख पगारासह सुवर्णसंधी

 

अहिल्यानगर नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक अत्यंत आनंददायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) राज्य शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागात (Food and Drug Administration) औषध निरीक्षक (गट-B) पदांसाठी 109 रिक्त पदांची अधिकृत भरती अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

या पदांसाठी वेतनश्रेणी ₹41,800 ते ₹1,32,300 इतकी असून संबंधित भत्तेही लागू राहतील. अर्ज प्रक्रिया 1 ऑगस्ट 2025 पासून सुरू झाली असून 21 ऑगस्ट 2025 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.

शैक्षणिक पात्रता म्हणून उमेदवारांकडे B.Pharm किंवा फार्मास्युटिकल सायन्स, मेडिसिन (क्लिनिकल फार्माकोलॉजी) किंवा मायक्रोबायोलॉजी मध्ये पदवी असणे आवश्यक आहे. मात्र, Pharm D पदवीधरांना या भरतीत पात्र मानण्यात आलेले नाही, याबाबत संबंधितांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

भरती प्रक्रियेत पात्र ठरलेले उमेदवार थेट राज्य सरकारी सेवेत दाखल होणार असल्याने ही एक मोठी संधी मानली जात आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत MPSC संकेतस्थळावर (https://mpsc.gov.in) जाऊन सविस्तर अधिसूचना पाहून अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

✍️ संपादक

खबरनामा न्यूज नेटवर्क

नरेंद्र पाटील काळे

 

1/5 - (1 vote)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 2 0 6 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे