Breaking
ई-पेपरउठ घे मशाल अन्यायाला जाळ खुशालग्रामपंचायत कारभारजलमिशन योजनाजिल्हा परिषद अहिल्यानगरजिल्हाधिकारीदिल्लीदिल्ली लोकसभानेवासानेवासा तालुका काँग्रेस पक्षनेवासा पंचायत समितीपोलीस निरीक्षक कार्यालय अहिल्यानगरब्रेकिंगभुमिअभिलेख कार्यालयभ्रष्टाचारमहाराष्ट्रमहाराष्ट्र शासन जलजीवन योजनामाहिती अधिकार 2005मुंबईमुंबई उच्च न्यायालय

जलजीवन मिशनमधील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा लोकसभेत मांडण्याची मागणी

काँग्रेसचे संभाजी माळवदे यांचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना निवेदन; अपूर्ण कामे, निकृष्ट दर्जा व दोषींवर कठोर कारवाईची मागणी

0 7 0 1 7 0

जलजीवन मिशनमधील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा लोकसभेत मांडण्याची मागणी

 

काँग्रेसचे संभाजी माळवदे यांचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना निवेदन; अपूर्ण कामे, निकृष्ट दर्जा व दोषींवर कठोर कारवाईची मागणी

 

नेवासा | प्रतिनिधी | खबरनामा न्यूज

राज्यभरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) अंतर्गत सुरू असलेल्या जलजीवन मिशनच्या कामांमधील कथित भ्रष्टाचार, अनियमितता, कामांचा निकृष्ट दर्जा आणि योजनांच्या अंमलबजावणीतील विलंब या गंभीर मुद्द्यांवर लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी संभाजी माळवदे यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

 

माळवदे यांनी खासदार वाकचौरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन जलजीवन मिशनच्या कामांबाबत जनतेत वाढत असलेल्या नाराजीची माहिती दिली. राज्यभरात हजारो कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू असली तरी अनेक ठिकाणी कामांना विलंब होत असल्याचा, निकृष्ट दर्जाची कामे होत असल्याचा तसेच प्रशासन आणि ठेकेदारांच्या संगनमतातून कथित भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी निवेदनातून केला आहे.

 

जनतेकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्यानंतर काही कामांची समितीमार्फत चौकशी करण्यात आली. त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यात दहापेक्षा अधिक अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई झाल्याने जलजीवन मिशनमधील कथित गैरव्यवहार जनतेसमोर आल्याचा दावा माळवदे यांनी केला आहे.

 

याप्रकरणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाविरोधात उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हा प्रश्न केवळ अहिल्यानगर जिल्ह्यापुरता मर्यादित नसून राज्यभरातील अनेक जलजीवन मिशन योजनांमध्ये अशाच प्रकारच्या तक्रारी असल्याचा आरोपही त्यांनी केला.

 

यामुळे लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात हा विषय उपस्थित करून केंद्र सरकारचे लक्ष वेधावे व संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी त्यांनी खासदार वाकचौरे यांच्याकडे केली.

निवेदनातील प्रमुख मागण्या

🔹 जलजीवन मिशनच्या अपूर्ण योजनांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा.

🔹 रखडलेली सर्व कामे तातडीने सुरू करण्यात यावीत.

🔹 निकृष्ट दर्जाच्या कामांची राज्य गुणवत्ता विभागामार्फत स्वतंत्र चौकशी करण्यात यावी.

🔹 संबंधित दोषी ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी.

🔹 भ्रष्टाचारात सहभागी आढळणाऱ्या अभियंत्यांवर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

 

खासदार वाकचौरे यांचे आश्वासन

यावेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी जलजीवन मिशनबाबतचा प्रश्न लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित करण्याचा प्रयत्न केला जाईल, तसेच या विषयावर संबंधित मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत दिल्ली येथे लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती संभाजी माळवदे यांनी दिली.

खबरनामा विशेष | चौकट

“जलजीवन मिशनमधील कथित घोटाळ्याची व्याप्ती राज्यभर; लवकरच जनआंदोलन” – संभाजी माळवदे

> “जलजीवन मिशनमधील कथित घोटाळ्याची व्याप्ती केवळ अहिल्यानगरपुरती मर्यादित नसून संपूर्ण राज्यभर आहे. प्रशासन आणि ठेकेदारांची भूमिका संशयास्पद असून सरकारदेखील या परिस्थितीस जबाबदार आहे. कमिशनखोरीमुळे कामांचा दर्जा खालावला आहे. या प्रकरणात दोषींवर ठोस कारवाई होईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. लवकरच राज्यव्यापी जनआंदोलन उभारण्यात येईल.”

– संभाजी माळवदे

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी

खबरनामा न्यूजची नोंद

 

या वृत्तातील भ्रष्टाचारासंदर्भातील आरोप, मागण्या आणि विधाने ही संभाजी माळवदे यांनी खासदारांना दिलेल्या निवेदनातील दावे आहेत. संबंधित विभाग, प्रशासन किंवा संबंधित पक्षाची भूमिका उपलब्ध झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.

 

— खबरनामा न्यूज

1/5 - (1 vote)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 0 1 7 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे