Breaking
ई-पेपरउठ घे मशाल अन्यायाला जाळ खुशालकृषी कायदाकृषी मूल्य आयोगकृषीवार्ताकेंद्र सरकार आयात निर्यात धोरणकेंद्रीय एफ आर पी कायदा 2026केंद्रीय कृषिमंत्रीतहसीलतहसीलदार नेवासातालुका कृषी अधिकारीनेवासा तालुकाब्रेकिंगमहाराष्ट्रवाकडीविमा कंपनीशेतकरीशेतकरी मेळावाशेतकरी विरोधी कायदेशेतकरी संघटना नेवासा

नेवासा तालुक्यात वाकडी येथे शेतकरी संघटनेमार्फत शेतकऱ्याच्या प्रश्नावर सखोल विचारमंथन

नेवासा तालुक्यात वाकडी येथे शेतकरी संघटनेमार्फत शेतकऱ्याच्या प्रश्नावर सखोल विचारमंथन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतशील शेतकरी बंडू गायकवाड होते

0 7 1 8 9 9

नेवासा तालुक्यात वाकडी येथे शेतकरी संघटनेमार्फत शेतकऱ्याच्या प्रश्नावर सखोल विचारमंथन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतशील शेतकरी बंडू गायकवाड होते

नेवासा( वाकडी) कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोक ढगे यांनी भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे भयानक शोषण होत आहे कारण देशांमध्ये भाजीपाल्याचे भाव ठरविण्यासाठी कुठलीही यंत्रणा नाही तसेच कष्ट करून पिकलेला आरोग्यदायी भाजीपाला घेण्यासाठी श्रीमंत सुखवस्तुलोक घासाघीस करतात हा भिकारी पण आहे शेतकऱ्याचा भाजीपाला फुकट खाण्याची समाजाची मानसिकता अत्यंत गंभीर आहे

याप्रसंगी प्रा कार्लस साठे, ज्येष्ठ शेतकरी नेते आप्पा तुवर, ज्येष्ठ शेतकरी कार्यकर्ते ताराचंद लोढे, अभ्यासू कार्यकर्ते डॉक्टर रोहित कुलकर्णी खबरनामा संपादक नरेंद्र काळे व ग्रामस्थांच्या वतीने दिगंबर काळेयांनी शेती प्रश्नावरगंभीर मतांनी मनोगत व्यक्त केले

अध्यक्षीय भाषणात शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अडवोकेट अजित काळे यांनी पिक विमा तील गोंधळाची स्थिती व कपाशीचा विमा दिला जात नाही यासंदर्भात सरकारला इशारा दिला. साखरेच्या संदर्भात बफर स्टॉक असतानाही साखर आयातीचे धोरण चुकीचे असल्याचे स्पष्ट केले. साखर अत्यंत अल्प प्रमाणात 14% पर्यंत खाण्यासाठी वापरली जाते तथापि त्याचा फार गंभीर विषय निर्मिती केली जाते. साखर िर्‍हाईकांनी शंभर रुपयापर्यंत खरेदी करण्याची मानसिकता ठेवावी. उसाच्या भावासाठी व पिक विमा साठी संघर्ष करण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र आले पाहिजे असे ठाम मत एडवोकेट काळे यांनी मांडले

🟥 विशेष चौकट | ॲड. अजित काळे यांची सरकारला सवालांची सरबत्ती

“५६ लाख शेतकऱ्यांना ३५ हजार कोटींची कर्जमाफी; मग सुभाषचंद्र यांच्यासाठी २२ हजार कोटींचा प्रश्न का?”

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी सरकारकडे पैसे नसल्याचे सांगितले जाते; मात्र मोठ्या कर्जदारांना दिलासा देताना सरकारची भूमिका वेगळी का? असा सवाल शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष व विधिज्ञ ॲड. अजित काळे यांनी वाकडी येथील शेतकरी संवाद कार्यक्रमात उपस्थित केला.

“शेतकऱ्यांना दिलेली दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी अनेक अटी-शर्तींमुळे सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. कर्जमाफीच्या आकडेवारीची पारदर्शकपणे तपासणी होणे गरजेचे आहे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.

दरम्यान, २०२५-२६ खरीप हंगामातील कापूस व तूर पीकविम्याचा प्रश्न, तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील आगामी ऊस गळीत हंगामातील ऊसदराचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

“गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना दर जाहीर करावा. योग्य दर मिळाला नाही तर शेतकरी संघटना संघर्षाची भूमिका घेईल,” असा इशाराही ॲड. अजित काळे यांनी दिला.

🌾 “गाव तेथे आणि वाडी-वस्ती तेथे शेतकरी संघटनेची शाखा उभारून शेतकरीहितासाठी तरुणांनी एकत्र यावे.”

ॲड. अजित काळे
राज्य उपाध्यक्ष, शेतकरी संघटना

जय जवान! 🇮🇳 जय किसान! 🌾

संघटनेचे कार्यकर्ते नाबदे यांनी शेतकरी संघटना बळकट करण्यासाठी शेतकऱ्यांनी सहयोग वाढवावा असे आवाहन केले. दिगंबर काळे यांनी ग्रामस्थांच्या वतीने कांद्या संदर्भात प्रश्न मांडले. सूत्रसंचालन एडवोकेट बाळासाहेब कावळे यांनी केले आभार प्रदर्शन डॉक्टर रोहित कुलकर्णी यांनी व्यक्त केले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 1 8 9 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे