कनिष्ठ स्तर श्रीरामपूरच्या न्यायालयात फडणवीस यांच्यासह इतरांवर संघटित फसवणूक केले प्रकरनीं गुन्हे दाखल.-एड. काळे
महाविकास आघाडी सरकारने विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देऊनही ते पाळले नाही याबाबत शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अजित काळे यांनी कायदेशीर मार्गाचा अवलंब करून 18 4 2025 रोजी श्रीरामपूर ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये प्रत्यक्ष पोलीस निरीक्षक यांना आरोपी देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे व माणिक कोकाटे यांचे विरुद्ध फिर्यादी युवराज भाऊसाहेब जगताप यांच्या नावे भारतीय न्यायदंड संहिता 2013 मधील कलम 171, 316 (दोन), 318 (चार) व तीन (पाच) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा नोंद

कनिष्ठ स्तर श्रीरामपूरच्या न्यायालयात फडणवीस साहेब यांच्यासह इतरांवर संघटित फसवणूक केले प्रकरनीं गुन्हे दाखल.-एड. काळे
शिरजगाव प्रतिनिधी.-
महाविकास आघाडी सरकारने विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देऊनही ते पाळले नाही याबाबत शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अजित काळे यांनी कायदेशीर मार्गाचा अवलंब करून 18 4 2025 रोजी श्रीरामपूर ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये प्रत्यक्ष पोलीस निरीक्षक यांना आरोपी देवेंद्र फडणवीस यांच्या सह, अजित पवार, एकनाथ शिंदे व माणिक कोकाटे यांचे विरुद्ध फिर्यादी युवराज भाऊसाहेब जगताप यांच्या नावे भारतीय न्यायदंड संहिता 2013 मधील कलम 171, 316 (दोन), 318 (चार) व तीन (पाच) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा नोंदवून एक महिना झाला तरीही पोलीस प्रशासनाने आरोपी विरुद्ध कुठलीही कारवाई केली नाही अथवा चौकशी केली नाही त्यामुळे श्रीरामपूर तालुका शेतकरी संघटनेच्या माध्यमातून श्रीरामपूर येथील कनिष्ठ स्तर न्यायालयात अखेर 14/5/2025 रोजी न्याय मिळणे कामी फिर्याद दाखल केली. शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष एडवोकेट अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर येथील न्यायालयात एडवोकेट प्रशांत कापसे एडवोकेट सर्जेराव घोडे अडवोकेट ऋतुजा कापसे एडवोकेट किशोर धनवटे काम बघत असून श्रीरामपूर येथील जुनियर डिव्हिजन कोर्ट मध्ये केस नंबर 901 / 2025 असून सी एन आर नंबर एम एच ए एच ओ ६०००९०२२०२५ आहे. याबाबत पहिली सुनावणी झाली असून न्यायालय संबंधित आरोपींना म्हणणे मांडण्यासाठी काय नोटीस काढतात याकडे फिर्यादीचे लक्ष लागले आहे. फिर्याद दाखल करतेवेळी एडवोकेट अजित काळे, जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, तालुका अध्यक्ष युवराज जगताप सुदामराव औताडे, साहेबराव चोरमल, संतोष पटारे, बबनराव उघडे, सुजित बोडके, एडवोकेट बाळासाहेब बकाल, एडवोकेट प्रशांत कापसे, एडवोकेट सर्जेराव घोडे, एडवोकेट रावसाहेब मोहन, सोपान नाईक, सागर गिऱ्हे, बाबासाहेब वेताळ आधी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी एडवोकेट अजित काळे म्हणाले की आपण हा लढा शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे पर्यंत लढणार आहोत. तालुकास्तरावरून जिल्हास्तर जिल्हास्तरावरून उच्च न्यायालय उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयापर्यंत राज्यातील शेतकऱ्यांसाठी न्याय मागणार आहोत. तसेच राज्यात विविध शेतकरी संघटनेच्या माध्यमातून अशा प्रकारच्या केसेस करण्याचे आंदोलन राज्यभर चालविणारा आहोत असेही एडवोकेट अजित काळे म्हणाले.