प्रभाकर शिंदे यांना ‘कृषी भूषण’ पुरस्काराने सन्मानित – शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
आपल्या उद्योजकीय दूरदृष्टीने कृषी व उद्योग क्षेत्रात नवसंजीवनी निर्माण करणारे पंचगंगा उद्योग समूहाचे संस्थापक प्रभाकर शिंदे यांना पुणे येथील कृषी महाविद्यालयात ‘कृषी सन्मान’ पुरस्काराने गौरविण्यात आले

प्रभाकर शिंदे यांना ‘कृषी सन्मान’ पुरस्काराने सन्मानित – शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
पुणे / नेवासा: आपल्या उद्योजकीय दूरदृष्टीने कृषी व उद्योग क्षेत्रात नवसंजीवनी निर्माण करणारे पंचगंगा उद्योग समूहाचे संस्थापक प्रभाकर शिंदे यांना पुणे येथील कृषी महाविद्यालयात ‘कृषी सन्मान’ पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्या यशस्वी प्रवासामुळे आणि शेतकऱ्यांसाठी त्यांनी दिलेल्या योगदानामुळे हा प्रतिष्ठित सन्मान प्रदान करण्यात आला.
कृषी व उद्योग क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान
नेवासा तालुक्यातील खुपटी गावातून आपल्या व्यवसायाचा प्रवास सुरू करणाऱ्या प्रभाकर शिंदे यांनी देशभरातील शेतकऱ्यांसाठी उच्च प्रतीची कांदा बियाणे उपलब्ध करून देण्याचे मोठे कार्य केले. देशातील १९ राज्यांमध्ये त्यांनी व्यवसायाचा विस्तार केला असून, पंचगंगा शुगर मिल स्थापन करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठीही मोठी संधी उपलब्ध करून दिली. तसेच, त्यांनी वैजापूर येथे आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली आहे.
शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण
प्रभाकर शिंदे यांच्या कृषी आणि उद्योग क्षेत्रातील योगदानाची दखल घेत त्यांना कृषी भूषण पुरस्कार मिळाल्याने शेतकरी वर्गात मोठा आनंद व्यक्त केला जात आहे. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे, बियाणे व साखर उद्योगाच्या माध्यमातून त्यांना मदत करणे या त्यांच्या कार्यामुळे राज्यभरात त्यांच्या नावाची चर्चा होत आहे.
ग्रामीण भागातून राष्ट्रीय स्तरावर यश
खुपटी सारख्या लहान गावातून येऊन कृषी आणि उद्योग क्षेत्रात मोठे नाव कमावणाऱ्या प्रभाकर शिंदे यांची ही यशोगाथा अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या गौरवामुळे संपूर्ण नेवासा तालुक्यात तसेच शेतकरी समाजात उत्साहाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे येथे महाविद्यालयातील आयोजित करण्यात आला होता त्यावेळी कृषी अग्रो कॉलेजचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते