शासकीय हमीभाव केंद्रावर नाव नोंदणी केलेले सोयाबीन खरेदी न केल्यास तहसीलदारांच्या दारात ओतणार तालुका अध्यक्ष युवराज जगताप
शेतकऱ्यांनी शासकीय हमीभाव केंद्रावर नाव नोंदणी करूनही सोयाबीन खरेदी करण्यात प्रशासन अयशस्वी ठरल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. शेतकरी संघटनांनी यासंदर्भात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

शासकीय हमीभाव केंद्रावर नाव नोंदणी केलेले सोयाबीन खरेदी न केल्यास तहसीलदारांच्या दारात ओतणार
श्रीरामपूर प्रतिनिधी: शेतकऱ्यांनी शासकीय हमीभाव केंद्रावर नाव नोंदणी करूनही सोयाबीन खरेदी करण्यात प्रशासन अयशस्वी ठरल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. शेतकरी संघटनांनी यासंदर्भात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
“आमचे सोयाबीन खरेदी होत नसल्याने आम्हाला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. जर प्रशासनाने वेळेत कारवाई करून सोयाबीन खरेदी केली नाही, तर आम्ही तहसीलदारांच्या दारात सोयाबीन ओतून निषेध नोंदवू,” असा इशारा शेतकरी नेते श्रीरामपूर तालुकाध्यक्ष युवराज जगताप यांनी दिला.
सरकारने हमीभाव जाहीर केल्यानंतरही सोयाबीन खरेदीचे केंद्रे अद्याप पुरेशा प्रमाणात सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना कर्जाचा भार वाढत चालला आहे. अनेक शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्रावर नाव नोंदणी केली असली, तरी खरेदी प्रक्रिया रखडल्याने त्यांना खासगी व्यापाऱ्यांकडे कमी दरात सोयाबीन विकण्याची वेळ येत आहे.
तहसीलदार कार्यालयाकडून या प्रकरणाची दखल घेतली जाईल, असे सांगण्यात आले असले तरी शेतकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया कायम आहे. पुढील काही दिवसांत प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास शेतकरी मोठ्या आंदोलनाच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.
शेतकऱ्यांचा आक्रोश आणि प्रशासनाची जबाबदारी
या परिस्थितीत प्रशासनाने शेतकऱ्यांच्या समस्या त्वरित सोडवून हमीभाव केंद्रांच्या कार्यक्षमतेत सुधारणा केली पाहिजे, अन्यथा ग्रामीण भागात असंतोषाची ठिणगी मोठे आंदोलन पेटवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आल असे आमचे प्रतिनिधी ज्यांनी सांगितले यावेळी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी पुढील प्रमाणे उपस्थित होतेयुवराज जगताप तालुकाध्यक्ष शेतकरी संघटना श्रीरामपूर
श्रीरामपूर तालुका शेतकरी संघटनेचे तहसीलदार यांना निवेदन देताना जिल्हाध्यक्ष अनिल अवताडे तालुकाध्यक्ष
युवराज जगताप साहेबराव चोरमल एण्ड सर्जेराव घोडे एण्ड प्रशांत कापसे डॉक्टर विकास नवले बबनराव उघडे