१ डिसेंबर रोजी आळेफाटा ता.जुन्नर येथे राज्यस्तरीय मराठा वधु-वर परीचय मेळावा..!
सध्या सोशल मिडीया व्हाटसअॅप हे माध्यम मोठे लोकप्रिय ठरत आहे या अॅपचे कधी चांगले तर कधी वाईट परीणाम ही समोर येतात मात्र जिल्ह्यातील काही युवकांनी व्हाटसअॅप थेट सोयरीक जमविण्यासाठी वापर करत रविवारी दि.१ डिसेंबर रोजी आळेफाटा ता.जुन्नर जि.पुणे येथे राज्यस्तरीय सकल मराठा वधु-वर थेट भेट परिचय मेळावा आयोजि

१ डिसेंबर रोजी आळेफाटा ता.जुन्नर येथे राज्यस्तरीय मराठा वधु-वर परीचय मेळावा..!
जुन्नर प्रतिनिधी – सध्या सोशल मिडीया व्हाटसअॅप हे माध्यम मोठे लोकप्रिय ठरत आहे या अॅपचे कधी चांगले तर कधी वाईट परीणाम ही समोर येतात मात्र जिल्ह्यातील काही युवकांनी व्हाटसअॅप थेट सोयरीक जमविण्यासाठी वापर करत रविवारी दि.१ डिसेंबर रोजी आळेफाटा ता.जुन्नर जि.पुणे येथे राज्यस्तरीय सकल मराठा वधु-वर थेट भेट परिचय मेळावा आयोजित केला आहे
शेतकऱ्यांची मुले व मुली साठी तसेच उपवर वधु-वरांसाठी अपेक्षित सोयरीक मिळावी या उद्देशातुन सगेसोयरे विवाह संस्थेच्या माध्यमातून उद्योजक हरीभाऊ जगताप व लक्ष्मण मडके पाटील यांनी व्हाटसअप ग्रृप वर ’सगेसोयरे मराठा वधु-वर’ हा ग्रृप तयार केला या ग्रृपच्या माध्यमातून वधु-वर यांचे फोटो व बॉयोडाटा देवाणघेवाण सुरु झाली या माध्यमातून आवडलेल्या स्थळांना संबंधित पालकांनी संपर्क करुन सोयरीक जमविल्या गेल्या नऊ वर्षांत ४७०० जणांची सोयरीक जमविल्या गेल्या
त्यांचे लग्न मोठ्या उत्साहात पार पडले आहेत ग्रृप वर वधु-वर व त्यांच्या नातेवाईकांचा वाढता प्रतिसाद पाहून या ग्रृपचे मुख्य अॅडमिन,हारीदास जगताप, लक्ष्मणराव मडके यांच्या सह त्यांच्या सहकार्यांनी वधु-वर मेळाव्याची संकल्पना मांडली
या सगेसोयरे मराठा वधु-वर ग्रृपला राज्यभरातील सामाजिक कार्यकर्ते व महिलांनी एकत्र येऊन सर्व सामान्य शेतकऱ्यांचा खर्च आणि वेळ वाचावा तसेच त्यांचे मुलं आणि मुलींसाठी घरबसल्या चांगल्या स्थळांची माहिती मिळावी या उद्देशाने राज्यभरात जिल्हा व तालुकानिहाय ग्रृप तयार केले असुन आता गावनिहाय ग्रृप तयार करुन सगेसोयरे मराठा बॉयोडाटा बॅक करण्याचे नियोजन असुन समाजबांधवांच्या सहकार्याने मराठा समाज वधु-वरांच्या थेट भेट परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मेळावा रविवार दि.१ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १०:०० वा. श्री.सावता महाराज मंदिर, कल्याण रोड, आळेफाटा ता.जुन्नर जि. पुणे येथे होणार आहे.सकल मराठा समाजामध्ये स्थळ बघताना सरकारी नोकरी, हुंडा, सोंदर्य, इतर मालमता अशा अनेक अपेक्षा वाढल्यामुळे लग्न जमवणे ही प्रक्रिया अवघड झाल्याने मेळाव्याची गरज आहे असे शंभूराज देशमुख यांनी सांगितले.
या मेळाव्यामुळे आपल्या इच्छेप्रमाणे जोडीदार शोधता येतो. आता जिल्हानिहाय मेळावे असल्यामुळे इच्छुक वधू-वरांनी व पालकांनी नाव नोंदणी करुन आतापर्यंत सगेसोयरे मराठा वधु-वर विवाह संस्थेच्या माध्यमातून विविध जिल्ह्यात यशस्वी वधु-वर मेळावे झाले आहेत. त्या मेळाव्यांच्या माध्यमातुन आजपर्यंत अनेक विवाह जमले आहेत. या मेळाव्यात मराठा समाजातील विवाहच्छूक वधु-वरांना मेळाव्याच्या ठिकाणी त्याच दिवसी वधु-वरांची नाव नोंदणी करता येईल तसेच या मेळाव्यात बैठक व्यवस्था मर्यादीत असल्यामुळे फक्त वधु-वर व यांच्यासोबत एकाच व्यक्तीला प्रवेश देण्यात येणार असून इतर विवाह संस्थेचे एजंट्स ,दलाल यांना प्रवेश मिळणार नाही ,या मेळाव्यात वधु-वर यांनी वेळेत उपस्थित राहून सहकार्य करावे तसेच मेळाव्यात येतांना एक स्वलिखित बाॅयोडाटा एक फोटो,पेन,डायरी सोबत आणावी या मेळाव्यातील सर्व नोंदणी धारकांची लोकप्रिय वेबसाईटला नावनोंदणी करण्यात येणार असून या मेळाव्याच्या संदर्भात 9670628136 / 9370628136 / 8669076684/ 96890 47270
या संपर्कनंबर वर फोन करुन माहिती घ्यावी अशी विनंती आयोजकांनी केली आहे , या मेळाव्यात अहमदनगर (अहिल्यानगर), नाशिक, पुणे, बीड, मुंबई, औरंगाबाद (संभाजीनगर)अशा अनेक विविध जिल्ह्यातील शिक्षित, डाॅक्टर, इंजिनिअर, व्यवसायिक,उद्योजक, उच्चशिक्षित,शेतकरी वधु-वर उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यामध्ये अनुरूप वधू-वरांना त्यांची ओळख, माहिती सांगून आपल्या जोडीदाराबद्दल असणार्या अपेक्षा व्यक्त करता येणार आहेत.
तसेच मराठा समाजाच्या उपवर वधू-वरांना त्यांच्या अपेक्षाप्रमाणे जोडीदार निवडता येणार आहे. या मेळाव्यास छावा संघटनेचे उपाध्यक्ष विजूभाऊ देवकर, गोमाता दुध संघाचे अध्यक्ष गणेश वाघमारे ,चैतन्य वधु-वर ग्रृप अॅडमिन, माजी मुख्याध्यापक,मा.श्री. गुरुवर्य, यशवंत दाते व गुरुदत्त ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष,मा. श्री दत्तात्रय वाळुंज हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी पुणे जिल्हा व परीसरातील सकल मराठा समाजातील विवाहइच्छुक वधु-वर व पालक जास्तीत जास्त या वधु-वर परिचय मेळाव्यास उपस्थित राहून नावनोंदणी करावी असे आवाहन असे आवाहन शिवप्रसाद गुंजाळ,रोहित गाडगे, शिवाजीराव देशमुख,श्रीकांत पाटील,सौ.सुमनताई राजेभोसले, प्रतिभा मरकड, सरिता गायकवाड,स्नेहलता पाटील यांनी केले आहे.