गोगलगाव येथे भव्य टाळ सप्ताह; विविध पुरस्काराने सन्मान
श्री क्षेत्र गोगलगाव येथे पारंपरिक टाळ सप्ताहाचा प्रारंभ होत असून, यंदाचा सप्ताह विशेष उपक्रमांसह भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे. प.पू. वै. योगीराज गंगागिरीजी महाराज यांनी सुरू केलेल्या आणि शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या सप्ताहाचे आयोजन श्रीराम जन्मोत्सव (५ एप्रिल) ते श्री भगवान हनुमान जयंती (१२ एप्रिल) या दरम्यान करण्यात आले आहे.

गोगलगाव येथे भव्य टाळ सप्ताह; विविध पुरस्काराने सन्मान
गोगलगाव, ता. नेवासा – श्री क्षेत्र गोगलगाव येथे पारंपरिक टाळ सप्ताहाचा प्रारंभ होत असून, यंदाचा सप्ताह विशेष उपक्रमांसह भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे. प.पू. वै. योगीराज गंगागिरीजी महाराज यांनी सुरू केलेल्या आणि शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या सप्ताहाचे आयोजन श्रीराम जन्मोत्सव (५ एप्रिल) ते श्री भगवान हनुमान जयंती (१२ एप्रिल) या दरम्यान करण्यात आले आहे.
या सप्ताहात संत महंतांच्या कीर्तनातून अमृतमय प्रवचने होणार असून, पंचक्रोशीतील भाविकांसाठी हा एक सोहळा असणार आहे. गावातील युवक आणि ग्रामस्थांचे नियोजन या सप्ताहात महत्त्वाचे स्थान राखत असून, संध्याकाळी महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले आहे. महंत ह.भ.प. गुरुवर्य भास्करगिरी महाराज आणि स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज यांच्या भेटी व दर्शनाचा लाभ भाविकांना मिळणार आहे.
नवीन उपक्रमांची सुरुवात
या वर्षी आयोजकांकडून एक नवा उपक्रम राबवण्यात येणार आहे. गावातील युवक, महिला तसेच समाजासाठी विशेष कार्य करणाऱ्या कुटुंबांचा सत्कार करण्यात येणार असून,
खालील पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत:
प्रगतशील शेतकरी पुरस्कार
आदर्श माता पुरस्कार
आदर्श व्यसनमुक्ती पुरस्कार
आदर्श अध्यात्मिक कुटुंब पुरस्कार
आदर्श वारकरी सेवेकरी पुरस्कार
आदर्श गरीब विधवा महिला पुरस्कार
आदर्श निस्वार्थी सेवा पुरस्कार
आदर्श समाजकार्य पुरस्कार
आदर्श अध्यात्मिक युवक पुरस्कार
संपूर्ण सप्ताहाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि भव्य स्वरूपात केले जात असून, पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी या भक्तीमय सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री विठ्ठल-रुक्मिणी समिती
च्या वतीने करण्यात आले आहे.
असे आमचे खबरनामाच्या प्रतिनिधीला सांगितले .