मराठा आरक्षण कायदेशीर व घटनात्मक तरतुदींचे पी पी टी सादरीकरण लवकरच मुख्यमंत्री पहाणार* !
मराठा आरक्षण चिंतन आंदोलनातील मागण्या प्रमाणे आरक्षण विषयातील कायदेशीर व घटनात्मक बाबी त्याचप्रमाणे मराठवाड्यातील मराठा समाजाला खुप पूर्वीच प्रदान केलेल्याआरक्षणाची तात्काळ आंमलबजावणी करून जात प्रमाणपत्र त्वरीत देण्याचे शासनादेश निर्गमित करावेत,सारथी संस्थेच्या वतीने नोंदणी दिनांका पासुन फेलोशीप व विविध कृतिशील कार्यक्रमाचे नियोजन,स्व. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या बाबत " मागेल त्याला कर्ज " या संकल्पनेतून कर्जाची मंजुरी यासाठी पतपुरवठा थेट स्व.आण्णा साहेब पाटील महामंडळास अधिकार देणे

मराठा आरक्षण कायदेशीर व घटनात्मक तरतुदींचे पी पी टी सादरीकरण लवकरच मुख्यमंत्री पहाणार* !
मुंबई (प्रतिनीधी) – मराठा आरक्षण चिंतन आंदोलनातील मागण्या प्रमाणे आरक्षण विषयातील कायदेशीर व घटनात्मक बाबी त्याचप्रमाणे मराठवाड्यातील मराठा समाजाला खुप पूर्वीच प्रदान केलेल्याआरक्षणाची तात्काळ आंमलबजावणी करून जात प्रमाणपत्र त्वरीत देण्याचे शासनादेश निर्गमित करावेत,सारथी संस्थेच्या वतीने नोंदणी दिनांका पासुन फेलोशीप व विविध कृतिशील कार्यक्रमाचे नियोजन,स्व. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या बाबत ” मागेल त्याला कर्ज ” या संकल्पनेतून कर्जाची मंजुरी यासाठी पतपुरवठा थेट स्व.आण्णा साहेब पाटील महामंडळास अधिकार देणे व फायनान्शीयल इन्स्टिट्युट म्हणून दर्जा द्यावा बहाल करणे, विवीध आंदोलना मध्ये सहभागी झालेल्या आंदोलकां वरील राज्यभारातील सर्वच गुन्हे तात्काळ मागे घेणे,जिल्हा निहाय वस्तीगृह, डॉ.पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजनेची प्रलंबित रक्कम अदा करणे,सरपंच स्वःसंतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्या प्रकरणात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सहभागी असणाऱ्या सर्वच मारेकऱ्यांवर नव्याने करण्यात आलेल्या बी एन एस व इतर कायद्या तील तरतुदी नुसार अधिकचे दोषारोप पत्र व गुन्हे दाखल करून त्यांना फाशीची शिक्षा होण्याइतपत पुरावे दाखल करणे,परभणीतील स्व.सोमनाथ सूर्यवंशी यांचे हत्येस कारणीभूत असणाऱ्या सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करने व यांना फाशीची शिक्षा होण्या इतपतचे पुरावे दाखल करने, नियोजीत ” मराठा क्रांती सुर्य स्व.अण्णासाहेब जावळे पाटील ” यांच्या नावाने स्थापन झालेले मराठवाडा आर्थिक विकास महामंडळास किमान ५०० कोटीची भरीव आर्थिक निधीची तरतुद खास बाब म्हणुन करणे असा संकलप आहे.
विशेष बाब म्हणजे आरक्षणाचे जेष्ठ अभ्यासक डॉ.राजेंद्र दाते पाटील यांनी तयार केलेलं अभ्यासु पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनचे सादरीकरणा च्या कायदेशीर व घटनात्मक बाबींची सुची म्हणजे ‘ ब्रिफ नोट ‘सादरीकरण करण्याची तारीख निश्चीत करण्या पूर्वीची पूर्वतयारी बैठकीत पत्र देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबत ज्यांचा परिश्रमातून आरक्षणाचा विषय मुख्यमंत्री यांचे समक्ष पोहचला ते जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सोबत उपोषणकर्ते रमेश केरे पाटील,मुख्य समन्वयक रविंद्र काळे पाटील व इतर मान्यवर दिसत असुन लवकरच सदरचे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन सादरीकरण शासनाच्या लिगल टीम समक्ष करण्याची वेळ निश्चीत करण्याचे आदेश मुख्यमंत्री यांनी प्रशासनास दिले असुन सोबत मराठा आरक्षणा बाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या क्युरेटिव्ह पीटिशन साठी जेष्ठ अभ्यासक डॉ.राजेंद्र दाते पाटील यांनी अत्यंत अभ्यासु व उपयुक्त असे न्याय निवाडे विवीध घटनापीठाचे निर्णय यांचे पुरावे संकलन केलेले ” पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन ” तयार केलेले असुन त्याचे लाईव्ह सादरीकरण होणार असल्याची माहिती मुख्य समन्वयक रविंद्र काळे पाटील यांनी एका पत्रका द्वारे माध्यमांना दिली आहे.
सदरचे चिंतन आंदोलन यशस्वी होण्यासाठी चिंतन समितीचे रविंद्र काळे पाटील,निलेश डव्हले, शैलेश भिसे,संतोष काळे,लक्ष्मण शिरसाठ, राहुल पाटील,विलास मालुसरे,हेमंत कर्डीले,मोती वाघ,गणेश थोरात, शैलेश चौहान,महेश मोरे,अनिल कुटे,संकेत शेटे,पुंडलीक पाटेकर,अमोल गायकवाड,राजु कुकलारे,रावसाहेब आळंदकर, पांडुरंग भुसारे,विकास बनसोडे, सुशील पायाळ,आप्पासाहेब जाधव,मनिष जोगदंडे,राजेश लांडगे, अनिल केरे,विद्यार्थी योगेश बहादुरे, नाथराव खंदारे, सुरज सोळुंके,नामदेव बागल, उध्दव सोळंके,डॉ.परमेश्वर माने,गोपाल घेगडे राहुल शिंदे,नागेश शिंदे,शुभम केरे,प्रताप पवार,एकनाथ कदम,उमेश अंडिल,अमोल धांडरे आदी मान्यवरां सह विजया मराठे,पुजा वाघ,निर्मला वाघ,सुमन सुर्यवंशी,भारती पवार,मंदा गायकवाड,लता काळे, रेखा गाडेकर,नीता पाटील,अर्चना मोहिते या सह अनेक मान्यवरांनी परिश्रम घेतले होते.