कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे शेतकरी संरक्षण कायदा आला पाहिजे शेतकरी संरक्षण व हितसंवर्धन करणे काळाची गरज
शेतकऱ्यांना संरक्षण कायदा का जसं डॉक्टरांना संरक्षण कायदा पत्रकारांना संरक्षण कायदा या धर्तीवर शेतकऱ्यांना पण पाहिजे अशी मागणी
नेवासा ( प्रतिनिधी ) शेतकरी संरक्षण कायदा आला पाहिजे डॉ ढगे नेवासा तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर शेतकरी संघटनेच्या आंदोलकांना उदबोधन करताना कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे म्हणाले की शेतकरी संरक्षण व हितसंरक्षण कायदा आला पाहिजे कारण ती काळाची गरज आहे आपल्या देशामध्ये ग्राहक संरक्षण कायदा, डॉक्टर संरक्षण कायदा, आणि पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात आहे तथापि शेतकऱ्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते अतिवृष्टी दुष्काळ पावसातील खंड तसेच शेतमालाचे भाव या संदर्भात शेतकऱ्यांना संरक्षण देणे आवश्यक आहे जगामध्ये फक्त भारतातच शेतकरी आत्महत्या करतात दुर्दैवाने दिवसेंदिवस आत्महत्या वाढतच आहे त्यासाठी डॉक्टर एम एस स्वामीनाथन शिफारशीप्रमाणे शेतमालाला भाव देण्यासाठी शेतकरी संरक्षण कायदा गंभीर स्वरूपाचा असावा अशी प्रतिपादन डॉक्टर ढगे यांनी केले शेतात वीज पडून मृत्य मुखी शेतकरी होतात शेतात सर्पदंशाने व बिबट्या मुळे अनेकांना मृत्यूला सामोरे जावे लागते तथापि शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमध्ये कुठल्याही प्रकारचे गंभीर स्वरूपाचा संरक्षण देणारा कायदा नाही यासाठी हाय कोर्टाची तज्ञ वकील डॉक्टर मुकुंदराव गायकवाड भारतीय जन संसद चे प्रदेशाध्यक्ष व कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे यांनी शेतकरी संरक्षण कायदा याचा मसुदा तयार केला आहे राज्यस्तरीय त्रि सदस्य समितीने मोलाचे काम केले आहे त्यामुळे हा कायदा आला पाहिजे अशी मागणी शेतकरी व सर्व संघटना तसेच सर्व पक्षाचे नेते व पदाधिकारी यांनी केली पाहिजे कारण ती काळाची गरज आहे
आमच्या खबरनाम्याची यूट्यूब चैनल पाहण्यासाठी या लिंक ला सबस्क्राईब करा व क्लिक करा:-https://youtube.com/channel/UCq-aKbcVC2bxCQ7zVsURDQg?si=uSb3N_7kpWYiM1ZE
माननीय प्रदेशाध्यक्ष अजित काळे साहेब यांचे भाषण ऐकण्यासाठी खबरनामा न्यूज चॅनलची लिंक ला क्लिक करून सविस्तर पाहू शकता:-https://youtu.be/CiQwW8qpsdw?si=9K5JfznZHPPyawuz