वरिष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी समजाऊन घेतला मराठा आरक्षण प्रश्न ‘मीट द ऑथर’ कार्यक्रमात सहभाग.*
१० नोव्हेंबर २०२४ रोजी " रीड अँड लीड फाउंडेशन "आयोजीत 'मीट द ऑथर' या उपक्रमास इंडिया टुडे चे वरिष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी सहभाग नोंदवला. रीड अँड लीड फाउंडेशन आयोजीत 'मीट द ऑथर' या कार्यक्रमाच्या ' पेजेस कम टू लाईफ ' या सत्रात भाग घेत महाराष्ट्रात होत असलेल्या विधानसभा निवडणुक,मराठा व मुस्लिम आरक्षण,आरोग्य, शैक्षणीक सक्षमीकरण, शहरातील पाणी प्रश्न आदी विषयी सखोल चर्चा
वरिष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी समजाऊन घेतला मराठा आरक्षण प्रश्न ‘मीट द ऑथर’ कार्यक्रमात सहभाग.*
प्रतिनिधी – दि.१० नोव्हेंबर २०२४ रोजी ” रीड अँड लीड फाउंडेशन “आयोजीत ‘मीट द ऑथर’ या उपक्रमास इंडिया टुडे चे वरिष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी सहभाग नोंदवला. रीड अँड लीड फाउंडेशन आयोजीत ‘मीट द ऑथर’ या कार्यक्रमाच्या ‘ पेजेस कम टू लाईफ ‘ या सत्रात भाग घेत महाराष्ट्रात होत असलेल्या विधानसभा निवडणुक,मराठा व मुस्लिम आरक्षण,आरोग्य, शैक्षणीक सक्षमीकरण, शहरातील पाणी प्रश्न आदी विषयी सखोल चर्चा केली.
या संवाद सत्रात अनेक क्षेत्रातील अभ्यासक तसेच बुद्धी जीवी वर्गास रीड अँड लीड फाउंडेशनने निमंत्रीत केले होते.
राजकीय घडामोडींचा सखोल अभ्यास असलेले राजदीप सरदेसाई यांनी आगामी काळात येणाऱ्या आव्हाना बद्दल सुद्धा सखोल चर्चा केली.
या वेळी मराठा आरक्षणाचे जेष्ठ अभ्यासक डॉ.राजेंद्र दाते पाटील यांनी घटना पीठाच्या अनेक न्याय निवाड्याचां संदर्भ देत आरक्षणाची घटनात्मक नक्की स्थिती काय आहे याचे अभ्यासु असे सविस्तर सादरीकरण केले.
या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते त्यात प्रा.गणी पटेल, प्रा.जिया, रविंद्र काळे पाटील,विधिज्ञ शेख अनिस, जमील खान,किड्स स्कुलचे इरफान, मिर्झा हरूण बेग,रीड अँड लीड फाउंडेशनचे अध्यक्ष मिर्झा अब्दुल कय्यूम नदवी आदी मान्यवरांनी आप आपले विचार मांडले.