शेतकरी संरक्षण कायदा उच्च वैचारिक विचार मंथन संपन्न… कृषी तज्ञ विद्यापीठ अशोकराव ढगे
शेतकरी संरक्षण कायदा उच्च वैचारिक विचार मंथन विधीतज्ञ अजित काळे साहेब यांच्यासोबत

शेतकरी संरक्षण कायदा उच्च वैचारिक विचार मंथन संपन्न... कृषी तज्ञ विद्यापीठ अशोकराव ढगे
नेवासा प्रतिनिधी शेतकरी संरक्षण कायदा उच्च वैचारिक विचार मंथन नेवासा येथे दैनिक खबरनामा कार्यालयात संपन्न झाले छत्रपती संभाजी नगर चे हायकोर्ट ज्येष्ठ कायदे तज्ञ व शेतकऱ्यांचे कैवारी अजितराव काळे व कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे यांनी शेतकरी संरक्षण कायदा आला पाहिजे यासंदर्भात उच्च वैचारिक विचार मंथन दिनांक 8 फेब्रुवारी 2025 रोजी दैनिक खबरनामा कार्यालय केले याप्रसंगी संपादक नरेंद्रजी काळे खबरनामाचे मार्गदर्शक संपादक रिषभ तलवार ज्येष्ठ शेतकरी नेते तुवर पाटील मुकुंदपूर चे सरपंच सतीश भाऊ निपुंगे व शेतकरी उपस्थित होते डॉक्टर ढगे म्हणाले की जगामधील विकसित देशांमध्ये शेतकऱ्यांना संरक्षण व हितसंवर्धन करण्यासाठी कायदे आहेत. इसराइल मध्ये ऍग्रो स्को व न्यूझीलंड आणि अमेरिका सारख्या देशात शेतकऱ्यांना संरक्षण देणारे कायदे आहेत शेतकरी तर हेलिकॉप्टरने फिरतात तरीसुद्धा त्यांना संरक्षण देण्यासाठी जोखीम व्यवस्थापन व नुकसान भरपाई कायदा इर्मा नावाने अस्तित्वात आहे भारतामध्ये पत्रकार संरक्षण कायदा, डॉक्टरांना संरक्षण देणारा कायदा, ग्राहक संरक्षण कायदा आहे. त्याच धर्तीवर भारतात शेतकऱ्यांना सुद्धा सर्वांगीण व परिपूर्ण शेतकरी संरक्षण व संवर्धन कायदा आला पाहिजे यासंदर्भात सखोल मार्गदर्शन करताना ज्येष्ठ विधीज्ञ अजितराव काळे म्हणाले की या कायद्यासाठी आपण कृषी क्षेत्रातील तज्ञ व शास्त्रज्ञ यांचा एक सेमिनार घेऊ नंतर कायद्यासाठी स्ट्रक्चर तयार करू व वेगवेगळ्या संदर्भातील डेफिनेशन तयार करून मागील संशोधनाच्या संदर्भाचा आधार घेऊन कायदा मसुदा अधिक समृद्ध प्रमाणात तयार करू जरी डॉक्टर ढगे यांनी मराठी व इंग्रजी शेतकरी संरक्षण कायदा मसुदा तयार केला असला तरी त्याला परिपूर्णता देण्यासाठी संपादक रिषभ तलवार यांनी अभ्यासपूर्वक रचनात्मक स्वरूप द्यावे शेतकऱ्यांनी चर्चेमध्ये भाग घेऊन काही उपयुक्त सूचना केल्या मुख्य संपादक नरेंद्रजी काळे यांनी सर्वांची ऋणनिर्देश व्यक्त केले