गंगापूर: महिला पुरवठा निरीक्षक ४० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अडकली; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक
गंगापूर तालुक्यातील पुरवठा निरीक्षक श्रीमती कांचन कांबळे (वय ३४) यांना ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले आहे. ही धडक कारवाई १३ जून २०२५ रोजी गंगापूर येथे करण्यात आली.

गंगापूर: महिला पुरवठा निरीक्षक ४० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अडकली; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई
गंगापूर (प्रतिनिधी): गंगापूर तालुक्यातील पुरवठा निरीक्षक श्रीमती कांचन कांबळे (वय ३४) यांना ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले आहे. ही धडक कारवाई १३ जून २०२५ रोजी गंगापूर येथे करण्यात आली.
तक्रारदाराने आपल्या आजोबांच्या नावे शिधा कार्डावर नावाचा समावेश करण्यासाठी अर्ज सादर केला होता. त्यासाठी श्रीमती कांबळे यांनी ४० हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने ही माहिती थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या औरंगाबाद युनिटला दिली. त्यानंतर उपअधीक्षक श्री. संदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रल्हाद कोरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक बाळासाहेब काळे, आणि पथकातील अधिकाऱ्यांनी सापळा रचला.
कारवाईत लाच रक्कम, iPhone 13 Pro, दुसरा मोबाईल आणि इतर महत्वाचे पुरावे जप्त करण्यात आले आहेत. आरोपीवर लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ च्या कलम ७ व ७ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.
झडतीत सापडलेले साहित्य
४०,००० रुपयांची लाच रक्कम
iPhone 13 Pro
दुसरा मोबाईल फोन
संबंधित कागदपत्रे
नागरिकांसाठी आवाहन
शासकीय कामांसाठी कोणत्याही प्रकारची लाच मागणी झाल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री क्रमांक १०६४ किंवा दूरध्वनी क्रमांक ०२४०-२३३७२१२ वर त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
—