Breaking
ई-पेपरकृषीवार्तादेवगड श्री दत्त देवस्थान नेवासानेवासा तालुकापंढरपूरब्रेकिंगमहाराष्ट्रमाजी आमदार पांडुरंग अभंगवारकरी संप्रदाय वार्तावारकरी सांप्रदायविशेष निवडवृक्षारोपण अभियानश्री शिंगणापूर तीर्थक्षेत्र नेवासाश्री संत ज्ञानेश्वर देवस्थान नेवासा पालखी सोहळासांस्कृतिक कार्यक्रम

ज्ञानेश्वरी घाटात दिंडीतील लाखो वारकऱ्यांच्या हाताने बीजरोपण

ग्रीन सिटी' मोहिमेअंतर्गत १ हजार बीज पाकिटांचे वितरण; भक्ती आणि पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संगम

0 6 9 3 8 3

ज्ञानेश्वरी घाटात दिंडीतील लाखो वारकऱ्यांच्या हाताने बीजरोपण

ग्रीन सिटी’ मोहिमेअंतर्गत १ हजार बीज पाकिटांचे वितरण; भक्ती आणि पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संगम

प्रतिनिधी | अहिल्यानगर

 

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे इमामपूर घाटात आगमन होताच, महसूलमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या **’ग्रीन सिटी मोहीम’**च्या वतीने वारकऱ्यांना १ हजार बीज वितरण करण्यात आले.

 

उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. यावेळी इमामपूर घाटाचे अत्यंत भक्तीमय वातावरणात ‘ज्ञानेश्वरी घाट’ असे नामकरण करण्यात आले.

👉पालखी दिंडीचा सविस्तर व्हिडिओ पाहण्यासाठी लाल बॉटल खालील व्हिडिओमध्ये क्लिक करा👇

या सोहळ्याला माजी मंत्री शंकरराव गडाख, ज्ञानेश्वर मंदिराचे माजी अध्यक्ष व माजी आमदार पांडुरंग अभंग, ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक, देविदास महाराज म्हस्के, युवा नेते उदयन गडाख व डॉ. निवेदिता गडाख यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या हजारो वारकऱ्यांना सुमारे १ हजार बियांच्या पाकिटांचे वितरण करण्यात आले. घाट चढताना वारकऱ्यांनी या पाकिटांमधील बिया रस्त्याच्या दुतर्फा टाकून निसर्गाची सेवा केली, ज्यामुळे आगामी काळात हा घाट संपूर्ण हिरवागार होण्यास मदत होणार आहे.

 

या मोहिमेसाठी प्रहार करिअर अकॅडमीचे संतोष पवार, विनोद सिंह परदेशी यांच्यासह सर्व स्टाफ आणि विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

 

या प्रसंगी उद्योजक सुरेश शेटे, बद्रीनाथ खंडागळे यांच्यासह परिसरातील असंख्य भाविक आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

ग्रीन आर्मी समितीचे सदस्य प्रा. हर्षल आगळे, इंजिनियर ॲड. कैलास दिघे, एकनाथ कौसे, विजया आगळे आणि ऋषिकेश कौसे यांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला.

प्रतिक्रिया

 

“वारीच्या या पवित्र काळात ज्ञानेश्वरी घाटाचे नामकरण आणि बीजरोपण असा हा भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम आहे. वारकऱ्यांच्या हाताने पेरलेली ही बीजे केवळ वृक्ष नव्हे, तर येणाऱ्या पिढ्यांसाठी ऑक्सिजनचे कारखाने ठरणार आहेत.”

 

प्रा. हर्षल आगळे

सदस्य, ग्रीन आर्मी समिती

👉येथे क्लिक करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी 👇लाल बटन ला👇 क्लिक करा आणि खबरनामा यूट्यूब चैनल वरील नवीन खबर पाहण्यासाठी क्लिक करा  👇

1/5 - (1 vote)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 9 3 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे