*📢 राष्ट्रीय चर्चासत्र:* “वन्यजीव संरक्षण कायदा – सुधारणेची गरज!”
*🌿 राष्ट्रीय चर्चासत्रात मार्गदर्शन करणार –* मा. रघुनाथदादा पाटील (राष्ट्रीय अध्यक्ष, भारतीय किसान संघ - परिसंघ / अध्यक्ष, शेतकरी संघटना महाराष्ट्र)

*🗓️ दि. 22 जुलै 2025 | स्थळ: कॉन्स्टिट्यूशन क्लब, नवी दिल्ली*
*📢 राष्ट्रीय चर्चासत्र:* “वन्यजीव संरक्षण कायदा – सुधारणेची गरज!”
*🌿 राष्ट्रीय चर्चासत्रात मार्गदर्शन करणार –* मा. रघुनाथदादा पाटील
(राष्ट्रीय अध्यक्ष, भारतीय किसान संघ – परिसंघ / अध्यक्ष, शेतकरी संघटना महाराष्ट्र)
देशातील शेतकरी, आदिवासी, बागायतदार, आणि वन विभागात काम करणाऱ्यांच्या समस्या व त्यांच्या हक्कांच्या संदर्भात फार्मर्स अँड फॉरेस्ट ड्वेलर्स पार्लमेंट (Organizing Committee Farmers and Forest Dwellers Parliament) च्या वतीने दिनांक 22 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वाजता दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब येथे एक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
या चर्चासत्रात मा. रघुनाथदादा पाटील यांना अँड. फ्रान्सिस जॉर्ज (खासदार, कोट्टायम, केरळ – चेअरमन) व पी. टी. जॉन (जनरल मॅनेजर – ऑर्गनायझिंग कमिटी) यांच्यातर्फे प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.
*🐾 प्रमुख मुद्दे:*
*🔹 1972 च्या वन्यजीव संरक्षण कायद्यामुळे वाढलेली अडचण:*
बिबट्या, रानडुकरे, हरणे, ससे, मोर, गवे, वानरे यांसारख्या प्राण्यांमुळे शेतकरी हतबल झाले आहेत. पीक हानी, मानवी मृत्यू आणि पाळीव प्राण्यांचे नुकसान सातत्याने वाढत आहे.
*🔹 अलीकडील धक्कादायक आकडेवारी:*
2024 मध्ये केवळ हत्तींच्या हल्ल्यामुळे 2,800 हून अधिक बळी गेले, वाघ, बिबट्या आदींसह ही संख्या आणखी वाढते.
*🔹 कायद्यात सुधारणा हवीच:*
संघर्ष टाळण्यासाठी वन्यजीव संरक्षण कायद्यात तातडीने सुधारणा आवश्यक आहेत. पीडित शेतकरी व वनवासींना तत्काळ मदत व नुकसान भरपाई देण्याची स्पष्ट तरतूद असावी.
*🔹 धोरणनिर्मात्यांशी थेट संवाद:*
या चर्चासत्रात केंद्र सरकारला सूचना सादर करण्यासाठी कायदेतज्ज्ञ, शेतकरी नेते, आदिवासी प्रतिनिधी, सामाजिक संस्था, वन कामगार यांचा सहभाग राहणार आहे.
*📌 उद्दिष्ट:*
वन्यजीव संवर्धन आणि मानवी उपजीविकेत योग्य समतोल साधणे.
🌾 शेती व शेतकऱ्यांच्या हक्कांबाबत धोरणात्मक चर्चा आणि पर्यायी उपाययोजना यासाठी हा राष्ट्रीय संवाद मंच ठरणार आहे
🐅🦌🐘 “वन्यजीव संरक्षण कायदा शेतकऱ्यांच्या हितासाठी फेरविचारात यावा, हीच या चर्चासत्राची मुळ भूमिका आहे!” 🐗🐒🦍
*प्रसिद्धीसाठी:*
खबरनामा न्यूज नेटवर्क




