पाचेगावच्या मनोहर मतकर यांचा शेतरस्त्यासाठी आमरण उपोषणाचा इशारा; तहसीलदारांसह विविध विभागांना निवेदन
गट क्रमांक ५२/१ मधील शेतरस्ता खुला करण्याची मागणी; १४ ऑगस्टपासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा निर्धार


पाचेगावच्या मनोहर मतकर यांचा शेतरस्त्यासाठी आमरण उपोषणाचा इशारा; तहसीलदारांसह विविध विभागांना निवेदन
गट क्रमांक ५२/१ मधील शेतरस्ता खुला करण्याची मागणी; १४ ऑगस्टपासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा निर्धार
नेवासा | प्रतिनिधी
पाचेगाव (ता. नेवासा) येथील रहिवासी व अर्जदार मनोहर यशवंत मतकर यांनी पाथरवाला येथील गट क्रमांक ५२/१ मधील शेतरस्ता तातडीने खुला करून द्यावा, अन्यथा दि. १४ ऑगस्ट २०२६ पासून आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.
यासंदर्भात तहसीलदार, नेवासा यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले असून, यापूर्वी दि. २६ जून २०२६ रोजी अर्ज तसेच दि. २० जुलै २०२६ रोजी धावता अर्ज देऊनही प्रश्न निकाली न निघाल्याने अखेर आमरण उपोषणाचा निर्णय घेण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
👉शेतकऱ्याचे काय म्हणणे आहे काय मागणी आहे हा वृत्तांत खबरनामा यूट्यूब चैनल वर पहा👉 लाल बटन👈 ला क्लिक करून येथे👇👇
प्रशासनासह लोकप्रतिनिधींनाही दिली माहिती
मनोहर यशवंत मतकर यांनी या शेतरस्त्याच्या प्रश्नाबाबत प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडेही मागणी केली आहे. तसेच ‘शिवज्योती महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत आमदार व खासदार यांनाही निवेदन देऊन शेतरस्ता खुला करण्याची मागणी करण्यात आली असल्याचा उल्लेख निवेदनात आहे.
👉या लिंक ला क्लिक करून पालकमंत्री यांनी आदेश दिले पण ते कागदावरच आहेत पहा पालकमंत्री काय म्हणाले खबरनामा यूट्यूब चैनल वर 👉लाल बटन👈 ला क्लिक करून👇👇
१४ ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा
प्रशासनाने तातडीने शेतरस्ता खुला न केल्यास दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी किंवा त्यानंतर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा मनोहर यशवंत मतकर यांनी दिला आहे. उपोषणादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासन व महाराष्ट्र शासनाची राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या कार्यालयांनी स्वीकारली निवेदनाची पोहोच
सदर निवेदनाची अधिकृत पोहोच पुढील कार्यालयांनी स्वीकारलेली आहे.
तहसील कार्यालय, नेवासा
पोलीस अधीक्षक कार्यालय, अहिल्यानगर
जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर (महसूल विभाग)
नेवासा पोलीस ठाणे
यामुळे महसूल व पोलीस प्रशासनासह संबंधित यंत्रणांना आमरण उपोषणाबाबत पूर्वसूचना देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
शेतकऱ्यांच्या दळणवळणाचा व शेतीच्या हक्काचा प्रश्न असलेल्या या शेतरस्त्याबाबत प्रशासन उपोषणापूर्वी सकारात्मक निर्णय घेते की नाही, याकडे पाचेगाव व परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.




