ताकेवस्तीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या चिमुकल्यांचा ‘भव्य दिंडी सोहळा’ भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न*
जय जय राम कृष्ण हरी' आणि 'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या अखंड नामघोषाने दुमदुमला परिसर; वारकरी संस्कृतीचे बालमनावर संस्कार घडविणारा उपक्रम

ताकेवस्तीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या चिमुकल्यांचा ‘भव्य दिंडी सोहळा’ भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न*
‘जय जय राम कृष्ण हरी’ आणि ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’च्या अखंड नामघोषाने दुमदुमला परिसर; वारकरी संस्कृतीचे बालमनावर संस्कार घडविणारा उपक्रम
नेवासा (अहिल्यानगर) | प्रतिनिधी*
आषाढी एकादशीच्या पावन पर्वाचे औचित्य साधत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ताकेवस्ती (ता. नेवासा) येथे शनिवार, दि. १८ जुलै २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेला ‘भव्य दिंडी सोहळा’ अत्यंत उत्साहात, भक्तिमय वातावरणात आणि पारंपरिक वारकरी संस्कृतीचा जागर करणाऱ्या वातावरणात संपन्न झाला.

“जय जय राम कृष्ण हरी” आणि “ज्ञानोबा माऊली तुकाराम”* यांच्या अखंड जयघोषात, हाती टाळ-मृदंग, खांद्यावर भगव्या पताका आणि मुखी विठ्ठलनाम घेतलेल्या चिमुकल्या वारकऱ्यांमुळे संपूर्ण ताकेवस्ती नगरी विठ्ठलमय झाली होती. वारकरी वेशभूषेत सजलेले विद्यार्थी आणि डोक्यावर तुळशीवृंदावन घेतलेल्या विद्यार्थिनी हे या दिंडी सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले.

सकाळी ठीक ८.०० वाजता शाळेच्या प्रांगणात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीचे पूजन करून दिंडी सोहळ्याला प्रारंभ झाला. त्यानंतर गावातून भक्तिमय वातावरणात दिंडी मार्गक्रमण करत असताना विठ्ठल नामाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
या सोहळ्यात ताकेवस्ती गावातील भजनी मंडळ, महिला भगिनी, पालक आणि समस्त ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत चिमुकल्या वारकऱ्यांचा उत्साह द्विगुणित केला. गावातील सर्व स्तरातील नागरिकांनी उपस्थित राहून वारकरी परंपरेप्रती असलेली आपली श्रद्धा व्यक्त केली.

या भव्य दिंडी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक दांपत्य श्री. प्रदीप उकांडे व शिक्षिका श्रीमती सुमती चौरे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. गणेश ताके, तसेच ताकेवस्ती माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष मा. श्री. गणेश ताके पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
👉न्यूज चैनल युट्युब वर बातमी पाहण्यासाठी लाल बटन ला क्लिक करा आणि बाजूची वारी दिंडी पहा🚩👇👇 येथे खाली पहा
या प्रसंगी युवा नेते श्री. गणेश ताके पाटील, श्री. शरद ताके, श्री. देवदास ताके सर, श्री. गणेश ताके, श्री. भारत ताके, श्री. सुरेश ताके, श्री. ज्ञानेश्वर ताके, श्री. ज्ञानेश्वर तुपे, श्री. हरीभाऊ ताके, श्री. भाऊसाहेब बागडे, श्री. अमोल ताके यांच्यासह महिला भगिनी, ग्रामस्थ आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक, ग्रामस्थ, भजनी मंडळ आणि सर्व सहकाऱ्यांनी केलेल्या परिश्रमांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले. विठ्ठल नामाच्या अखंड गजरात आणि भक्तिरसात न्हालेल्या या दिंडी सोहळ्याने विद्यार्थ्यांमध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा, भारतीय संस्कृती, सामाजिक ऐक्य आणि भक्तीभावाचे संस्कार रुजविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले.
विठू नामाच्या गजराने अवघा परिसर मंत्रमुग्ध झाला असून, या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.”
✍️ *खबरनामान्यूज /नेवासा




