Breaking
उठ घे मशाल अन्यायाला जाळ खुशालकायदा आणि प्रशासनकृषी कायदाकृषी मूल्य आयोगकृषी सन्मान पुरस्कारकृषीवार्ताकोल्हापुरगुणवंतांचा सत्कारनेवासापुरस्कारब्रेकिंगमहाराष्ट्रमाहिती अधिकार 2005राष्ट्रवादी शरद पवार गटविशेष निवडशरदजोशी विचारमंच शेतकरी कामगार एम एस फाऊंडेशन शेतकरी संघटना महासंघ नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य.शेतकरी विरोधी कायदेशेतकरी संघटना महाराष्ट्र राज्यसाखर आयुक्त पुणेसांगलीहमीभाव

“शरद जोशींची चळवळ पुढे नेण्याची ताकद रघुनाथदादा पाटील यांच्यात”आ. जयंत पाटील यांचे गौरवोद्गार;

आ. जयंत पाटील यांचे गौरवोद्गार; ईश्वरपूर येथे अमृतमहोत्सवी सत्कार सोहळ्यात शेतकरी चळवळीच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब

0 6 4 1 2 2

“शरद जोशींची चळवळ पुढे नेण्याची ताकद रघुनाथदादा पाटील यांच्यात”

आ. जयंत पाटील यांचे गौरवोद्गार; ईश्वरपूर येथे अमृतमहोत्सवी सत्कार सोहळ्यात शेतकरी चळवळीच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब

खबरनामा न्यूज | ईश्वरपूर प्रतिनिधी

शेतकरी नेते स्व. शरद जोशी यांच्या पश्चात राज्यातील शेतकरी चळवळीचे प्रामाणिक आणि संघर्षशील नेतृत्व जर कुणी करत असेल, तर ते रघुनाथदादा पाटील असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी काढले. ईश्वरपूर येथे आयोजित रघुनाथदादा पाटील यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर इंद्रजीत भालेराव, खासदार धैर्यशील माने, माजी जिल्हाध्यक्ष दिलीप पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विवेक पाटील, माजी आमदार भगवान साखळे, शिवाजी नांद खिले, कालिदास आपेट तसेच अनिल औताडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी चळवळीतील योगदानाचा गौरव केला.

या कार्यक्रमाचा संपूर्ण वृत्तांत पाहण्यासाठी👉 लाल बटनवर क्लिक करा संपूर्ण खबरनामा न्यूज चैनल वर प्रथमच 👇👇

आ. जयंत पाटील म्हणाले की,

“शरद जोशी यांच्या विचारांची परंपरा पुढे नेण्याची ताकद रघुनाथदादा पाटील यांच्यात आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने संघर्ष केला. अनेक संकटे आली तरी त्यांनी तत्त्वांशी तडजोड केली नाही.”

संघर्षातून उभा राहिलेला नेता”

इंद्रजीत भालेराव यांनी आपल्या भाषणात सांगितले की, रघुनाथदादा पाटील यांनी गेली अनेक दशके शेतकऱ्यांसाठी लढा दिला. “अशा चळवळीतील कार्यकर्ते आणि नेते आता दुर्मिळ होत चालले आहेत,” असे ते म्हणाले.

खासदार धैर्यशील माने यांनीही रघुनाथदादा यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की,

“शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य वेचणारे हे नेतृत्व म्हणजे ग्रामीण महाराष्ट्राचा खरा आवाज आहे.”

दिलीप पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,

“शेतकरी चळवळीचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल, तेव्हा शरद जोशींसोबत रघुनाथदादा पाटील यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाईल.”

शेतकरी प्रश्नांवर ठाम भूमिका

कार्यक्रमात अनेक वक्त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर भाष्य करताना शेतकऱ्यांचे प्रश्न, बाजारभाव, उत्पादन खर्च, निर्यातबंदी, शेतीमालाचे दर आणि कृषी धोरणांवर सखोल चर्चा केली. रघुनाथदादा पाटील यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला.

त्यांनी सांगितले की,

“शेतकरी हा देशाचा कणा आहे. मात्र धोरणात्मक निर्णयांमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी चळवळ अधिक व्यापक करावी लागेल.”

अहिल्यानगर मधून शेतकरी संघटनेचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष अनिल औताड ज्येष्ठ नेते हरिभाऊ आप्पा तुवर रोहित कुलकर्णी कडू भाऊ पवार कैलास पवार,भास्कर तुवर

श्रीरामपूर तालुका अध्यक्ष युवराज जगतापतसेच खबरनामा न्यूज चे संपादक विशेष निमंत्रण देऊन तेही उपस्थित होते

कार्यक्रमात उत्स्फूर्त प्रतिसाद

अमृतमहोत्सवी सत्कार सोहळ्यासाठी राज्यभरातून शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध पक्षांचे नेते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात रघुनाथदादा पाटील यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

फोटो कॅप्शन :

ईश्वरपूर येथे आयोजित अमृतमहोत्सवी सत्कार सोहळ्यात शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आ. जयंत पाटील, खासदार धैर्यशील माने, इंद्रजीत भालेराव, दिलीप पाटील आदी उपस्थित होते.

1.5/5 - (2 votes)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 4 1 2 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे