सातार्यात अभिनेता सयाजी शिंदेंचा वृक्षारोपण उपक्रमाला पाठिंबा
प्रसिद्ध चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे यांनी सातारा जिल्ह्यातील सह्याद्री देवराई येथे भेट देऊन वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन उपक्रमाचे कौतुक केले. स्थानिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांचे अभिनंदन करीत भविष्यातही या उपक्रमाला साथ देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

सातारा (प्रतिनिधी) :

सयाजी शिंदे यांनी यापूर्वी राज्यातील विविध भागांमध्ये वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचे महत्त्वाचे कार्य केले आहे. त्याच धर्तीवर सातारा परिसरातील डोंगर रम्य भागात मोठ्या प्रमाणावर झाडे लावण्याचे व त्यांचे संवर्धन करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. या उपक्रमातून एक लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या प्रसंगी अभिनेते मकरंद अनासपुरे तसेच नानाजी पाटेकर (गुरुजी) यांनीही या अभियानासाठी शुभेच्छा व सहकार्याची ग्वाही दिली. लवकरच प्रशासनाच्या सहकार्याने नेवासा तालुक्यातही व्यापक वृक्षारोपण मोहिम राबवण्यात येणार असल्याचे गोगलगाव चे सरपंच योगेश मस्के आयोजकांनी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान सयाजी शिंदे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत निसर्ग रक्षणाची गरज अधोरेखित केली. “झाडे लावणे आणि त्यांचे संगोपन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. हा उपक्रम समाजाच्या सह भागा नेच यशस्वी होऊ शकतो,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रसिद्ध चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे यांनी सातारा जिल्ह्यातील सह्याद्री देवराई येथे भेट देऊन वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन उपक्रमाचे कौतुक केले. स्थानिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांचे अभिनंदन करीत भविष्यातही या उपक्रमाला साथ देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

📷 कार्यक्रमाचे छाया चित्रांत सयाजी शिंदे, स्थानिक कार्यकर्त्यांसह वृक्षारोपणाचा उपक्रम व संवादाचे क्षण टिपले गेले आहेत.