Breaking
आमदार चंद्रशेखर पाटील घुलेआमदार डाँ. नरेंद्र पाटील घुलेआमदार नरेंद्र पाटील घुले नेवासा शेवगावई-पेपरउठ घे मशाल अन्यायाला जाळ खुशालकृषीवार्ताजयंती राष्ट्रीय पुरुषांचीजिल्हाधिकारीज्ञानेश्वर सहकारी साखर कारखानातहसीलदार नेवासानेवासा तालुकाब्रेकिंगमहाराष्ट्रलोकनेते मारुतराव घुले पाटील यांचे 24 वे पुण्यस्मरणवारकरी संप्रदाय वार्ताशेतकरीसहकार महर्षी लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखानासहकारी साखर कारखानासांस्कृतिक कार्यक्रमस्नेह मेळावा

सहकाराचे महामेरू, सकलजनांचे आधारवड लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांच्या २४ व्या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन सेवेचे आयोजन

उजाड माळरानावर सहकाराचे नंदनवन फुलवणाऱ्या लोकनेत्यास कृतज्ञ अभिवादन

0 6 8 6 7 3

 

सहकाराचे महामेरू, सकलजनांचे आधारवड लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांच्या २४ व्या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन सेवेचे आयोजन

उजाड माळरानावर सहकाराचे नंदनवन फुलवणाऱ्या लोकनेत्यास कृतज्ञ अभिवादन

नेवासा, दि. ३ जुलै :

अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकार चळवळीला नवी दिशा देणारे, उजाड माळरानावर विकासाचे नंदनवन फुलवणारे, सहकार क्षेत्रातील दूरदृष्टीचे, अभ्यासू आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांचे नाव आजही आदराने घेतले जाते. “सहकाराचे महामेरू, सकलजनांचे आधारवड” अशी ओळख निर्माण करणाऱ्या या थोर नेत्यांच्या २४ व्या पुण्यस्मरणानिमित्त ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कडूम (छोटे मारुती, श्रीक्षेत्र आव्हाडी देवाची) यांच्या सुश्राव्य कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

बुधवार, दि. ८ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.३० ते ११.३० या वेळेत हा कार्यक्रम श्री संत नागेबाबा भक्त निवास, भेंडा बुद्रुक, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर येथे संपन्न होणार आहे.

 

लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांनी उभारलेला ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना आणि ज्ञानेश्वर उद्योग समूह हे केवळ उद्योग नव्हते, तर ग्रामीण भागातील हजारो कुटुंबांच्या आर्थिक उन्नतीचे केंद्र ठरले. सहकाराच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी, कामगार आणि युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. अनेकांच्या घरात आर्थिक स्थैर्य आले, गावागावांतील संसार उभे राहिले आणि संपूर्ण परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळाली.

 

विशेष म्हणजे, जायकवाडी प्रकल्पाच्या बॅकवॉटर परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. जिल्हा सहकारी बँक आणि सहकार क्षेत्रातील विविध संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळवून देणे, पाणी परवाने मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे आणि शेतीला शाश्वत आधार निर्माण करणे, ही त्यांची कार्यपद्धती होती. त्यांच्या दूरदृष्टीमुळे बॅकवॉटर परिसरातील अनेक शेतकरी कुटुंबांना दिलासा मिळाला आणि त्यांच्या शेतीबरोबरच संसारालाही बळकटी मिळाली.

 

सहकार हा केवळ उद्योग उभारण्यापुरता मर्यादित नसून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम आहे, हा विचार त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केला. जिल्हा सहकारी बँक, सहकारी संस्था आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला सक्षम करणारे त्यांचे योगदान आजही सहकार क्षेत्रासाठी दिशादर्शक मानले जाते. त्यामुळे त्यांना सहकारातील अभ्यासू, दूरदृष्टी असलेले आणि विकासाला समर्पित नेतृत्व म्हणून आजही स्मरण केले जाते.

 

त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित या कार्यक्रमास उपस्थित राहून त्यांच्या कार्याला कृतज्ञ अभिवादन करावे, सहकाराच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करावा तसेच त्यांच्या सहकाऱ्यांच्या योगदानालाही मानाचा मुजरा द्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

आयोजक :

मा. संचालक मंडळ

लोकनेते मारुतरावजी घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना लि.

तथा ज्ञानेश्वर उद्योग समूह, ज्ञानेश्वरनगर, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर.

 

प्रसिद्धी विभाग :

खबरनामा न्यूज

नरेंद्र पाटील काळे

नेवासा, जि. अहिल्यानगर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 8 6 7 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे