Breaking
ई-पेपरकृषीवार्ताज्ञानेश्वर सहकारी साखर कारखानातहसीलदार नेवासानिवडणूक आयुक्तनिवडणूक वार्तानेवासापोलीस पाटील संघटना नेवासाब्रेकिंगशेवगावसहकारी साखर कारखानासहकारी साखर कारखाना निवडणूकसहकारी साखर कारखाने एफ आर पीसाखर आयुक्त अहमदनगरसाखर आयुक्त पुणेस्वर्गीय मारोतरावजी घुले पाटील जयंती निमित्त पुरस्कारहमीभाव

ब्रेकिंग न्यूज ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना बिनविरोध; सभासदांनी दाखवला सहकाराचा आदर्श

सभासदांचा विश्वास कायम; सहकार, विकास आणि पारदर्शकतेच्या नव्या पर्वाची सुरुवात! 

0 6 7 9 1 7

ब्रेकिंग न्यूज

ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना बिनविरोध; सभासदांनी दाखवला सहकाराचा आदर्श

नेवासा( प्रतिनिधी)नेवासा तालुक्यातील सहकार क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा मानला जाणारा ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध पार पडल्याने सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्वर्गीय घुले पाटील यांनी विकासाचे स्वप्न डोळ्यांसमोर ठेवून उभी केलेली ही सहकाराची चळवळ आजही त्याच विचारांनी पुढे जात असल्याची भावना सभासदांनी व्यक्त केली आहे.

माननीय चंद्रशेखरजी घुले साहेब आणि नरेंद्र पाटील घुले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची वाटचाल सुरू असून, पुन्हा एकदा सभासदांनी त्यांच्यावर विश्वास व्यक्त करत नेतृत्वाची धुरा एकहाती सोपविली आहे.

राहुरी कारखान्यासह इतर अनेक सहकारी संस्थांच्या इतिहासाकडे पाहता वारंवार होणारे सत्तांतर, अंतर्गत संघर्ष आणि त्याचा विकासावर होणारा परिणाम सभासदांनी अनुभवला आहे. त्यामुळे सहकारात विघ्न नको, विकासाला गती मिळावी आणि कारखान्याची प्रगती अखंड सुरू राहावी या उद्देशाने सभासदांनी सामंजस्याचा मार्ग स्वीकारल्याचे बोलले जात आहे.

या बिनविरोध निवडीमुळे जागृत आणि दूरदृष्टी असलेल्या सभासदांचा विजय झाल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे. आता कारखान्याच्या नेतृत्वाकडून ऊस उत्पादक सभासदांना न्याय्य दर, पारदर्शक प्रशासन, विकासाभिमुख निर्णय आणि सर्व घटकांना समान संधी मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

“पारदर्शक व्यवहार हीच खरी ओळख” या तत्त्वावर कारखान्याची वाटचाल झाली तर ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रासाठी आदर्श ठरेल, असा विश्वास सभासदांमधून व्यक्त होत आहे.

ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याची ही बिनविरोध निवड केवळ निवडणूक प्रक्रिया नसून सहकार, एकजूट आणि विकासाच्या विचारांचा विजय असल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे सर्वच बिनविरोध संचालकांचे हार्दिक अभिनंदन सर्व सभासद वर्गाकडून संत ज्ञानेश्वर यांच्या पावनभूमी मध्ये तसेच विरोधकांचे सुद्धा हार्दिक अभिनंदन सुज्ञपणांनी माघार घेतली त्यांचे अभिनंदन

सभासदांचा विश्वास कायम; सहकार, विकास आणि पारदर्शकतेच्या नव्या पर्वाची सुरुवात! 

बिनविरोध निवडून आलेली पुढील प्रमाणे

*लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकार साखर कारखाना संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध*

भेंडा:– माजी आमदार नरेंद्र घुले व माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यामचे नेतृत्वाखालील  लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या सर्वच्या सर्व  २१ जागाची निवडणूक  बिनविरोध

झाली आहे.

*बिनविरोध निवडून आलेले संचालक असे…*

*शेवगाव गट (३ जागा बिनविरोध):–*

नरवडे सुधाकर नारायणराव,

भोसले पंडीत रामभाऊ,

राजपूरे रामनाथ नामदेव

*शहरटाळकी गट (३ जागा बिनविरोध):–* घुले नरेंद्र मारुतराव,घुले चंद्रशेखर मारुतराव,

खरड बाळासाहेब बापूसाहेब

*कुकाणा गट (३ जागा बिनविरोध):–*

म्हस्के नारायण कारभारी,देशमुख हिम्मतसिंह देसाई,अभंग अमोल विठ्ठल

*नेवासा गट (२ जागा बिनविरोध):–*

शेळके जनार्दन कचरु व

कोकणे दादासाहेब गुलाबराव

*वडाळा गट (२ जागा बिनविरोध):–*

कदम जनार्दन रामभाऊ व पटारे प्रसाद जनार्दन

*ढोरजळगाव गट (२ जागा बिनविरोध):–* म्हस्के मच्छिंद्र सुर्यभान व भेंडेकर गोरक्षनाथ विठठल

*अनु.जाती/जमाती मतदार संघ (बिनविरोध):–* नन्नवरे विकास चंद्रभान

*महिला प्रतिनिधी मतदार संघ (२ जागा (बिनविरोध):–*

काळे सुमनबाई दत्तात्रय व

तानवडे रंजना अशोक

*भटके-विमुक्त मतदार संघ (बिनविरोध):–* मिसाळ अशोक लक्ष्मण

*नामाप्रवर्ग मतदार संघ (बिनविरोध):–*

पावसे संतोष शंकरराव

*उत्पादक सहकारी संस्था,बिगर उत्पादक-पणन संस्था मतदार संघ जागा(बिनविरोध):–* बबनराव भुसारी

1.5/5 - (2 votes)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 9 1 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे