माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अनेक धाडसी निर्णय
शेतकरी हिताच्या मागण्या मान्य केल्याने *शेतकरी संघटनेने दिला शिंदेसेनेला पाठींबा
शेतकरी हिताच्या मागण्या मान्य केल्याने
*शेतकरी संघटनेने दिला शिंदेसेनेला पाठींबा*
नेवासा – शेतकरी हिताची भुमिका घेतल्याने शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष एडवोकेट अजितदादा काळे यांनी शिंदेसेनेला राज्य स्तरीय पाठींबा जाहीर केलेला आहे .
अॅड अजितदादा काळे यांनी सांगितले कि गेल्या अडीच वर्षात शिंदेसेनेने अनेक धाडसी निर्णय घेतलेले आहेत . यापुढेही शिंदे सरकारने भविष्यात शेतकऱ्यांना कृषिपंपाला संपूर्ण विजबिल माफी , दिवसा 12 तास विज देणे, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी , सर्व शेतमालाला हमीभाव व 20 टक्के हमीभावावर वाढ देणे आणि त्या बरोबर ठिकठिकाणी हमीभाव केंद्रे उघडणे या शेतकरी संघटनेच्या भुमिका शिंदेसेनेने हातात घेतल्याने पाठींबा देण्यात आलेला आहे .
याबरोबरच दुधाला 40 रु हमीभावाचा कायदा करणे, दुधभेसळ कायदा सक्षमपणे राबविणे , दोन साखर कारखान्यातील 25 कि मी ची अंतराची अट काढून टाकणे , सी रंगराजन समितीच्या फॉर्मुल्या नुसार 70 : 30 नुसार साखरेसह उपपदार्थांचा हिशोब ग्राह्य धरून ऊसाला 5000 रु प्रतिटन भाव देणे , पाणीपट्टी थकबाकी संपूर्णपणे माफ करणे , कर्जमाफी हि विनाअट करणे या शेतकरी हिताच्या मुद्दयांवर शेतकरी संघटना शिंदेसेनेकडे आग्रही राहणार आहे .
सद्य परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याइतके धाडसी नेतृत्व इतरत्र दिसत नसल्याने शेतकऱ्यांचे भविष्यातील हित साधले जाईल अशी आशा वाटत असल्याचे सुतोवाच एडवोकेट अजितदादा काळे यांनी केले .
ह्या पार्श्वभुमीवर नेवासा विधानसभा मतदार संघात श्री विठ्ठलराव लंघे ह्यांच्या पाठीशी शेतकरी संघटना राहणार असल्याचे तालुकाध्यक्ष मेजर अशोक काळे यांनी सांगितले .