अतिक्रमण पीडित व्यापाऱ्यांचे पुनर्वसन होईपर्यंत वित्तीय संस्थाकडून करण्यात येणारी कर्जवसुली थांबवावी – संभाजी माळवदे*
जिल्हाधिकारी यांना भेटून निवेदनाद्वारे केली मागणी* -

*
अतिक्रमण पीडित व्यापाऱ्यांचे पुनर्वसन होईपर्यंत वित्तीय संस्थाकडून करण्यात येणारी कर्जवसुली थांबवावी – संभाजी माळवदे*
*जिल्हाधिकारी यांना भेटून निवेदनाद्वारे केली मागणी* –
नेवासा( प्रतिनिधी) – अतिक्रमण पीडित व्यापाऱ्यांचे पुनर्वसन होईपर्यंत वित्तीय संस्थाकडून करण्यात येणारी कर्जवसुली वर्षभरासाठी थांबवावावी अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे संभाजी माळवदे यांनी केली.
सविस्तर वृत्त असे की, शासनाकडून संपूर्ण राज्यभर शासकीय जागेवरील अतिक्रमण हटविण्याची तातडीची मोहीम राबविण्यात आली आहे. तातडीच्या नोटीसा व तातडीची कारवाई यामुळे अनेक व्यापाऱ्याचे व्यवसाय उध्वस्त होऊन ‘होत्या चे नव्हते’ झाले. या व्यापाऱ्यांमध्ये मोठ्या गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. अशातच वित्तीय संस्थादेखील आपण दिलेले कर्ज आता बुडते की काय या भीतीने दिलेले कर्ज वसुलीसाठी पुढे सरसावल्या आहे. यात राष्ट्रीयकृत बँका, मल्टीस्टेट, पतसंस्था, विविध फायनान्स कंपनी, यांचा समावेश असून या संस्थानी अतिक्रमण पीडित व्यापाऱ्यांना कर्ज हप्त्याचा जोराचा तगादा सुरु केला आहे. यामुळे व्यापारी हैराण झाले आहे. अतिक्रमण हटविल्याने व्यवसाय उध्वस्त झालेल्या व्यापाऱ्यांपुढे कर्ज हप्ता भरण्याचे मोठे संकट निर्माण झाले आहे. अनेक व्यापाऱ्यांनी तर यातून मुक्तीसाठी आत्महत्या हा मार्ग पत्करला आहे. व्यापाऱ्यांच्या या समस्याची गंभीर दखल घेत आज प्रदेश काँग्रेसचे कामगार विभागाचे अध्यक्ष संभाजी माळवदे यांनी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी यांची भेट घेत ज्या व्यापाऱ्यांचे अतिक्रमणमध्ये दुकानें काढण्यात आली आहे. त्या व्यापाऱ्यांचा व्यवसाय स्थिर होईपर्यंत साधारण एक वर्षाच्या कालावधीसाठी वित्तीय संस्थाकडून यांना कर्जाचे हप्ते भरण्यासाठी सवलत द्यावी. कुठल्याही प्रकारचा त्रास या व्यापाऱ्यांना देऊ नये, तसा आदेश वित्तीय संस्थांना द्यावा अशी मागणी केली. याशिवाय सदर प्रश्न हा राज्यभराचा असल्यामुळे व धोरणत्मक असल्यामुळे या प्रश्नाबाबत राज्याचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री यांच्याशी संवाद साधून राज्यभरासाठी हा निर्णय लागू करावा अशी मागणी जिल्हाधिकारी यांना भेटून लेखी निवेदणाद्वारे करण्यात आली. यावेळी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धिराम सालीमठ यांनी अतिक्रमण पीडित व्यापाऱ्यांच्या या प्रश्नाबाबत त्वरित लीड बँकाशी चर्चा करून निर्णय घेऊन व्यापाऱ्यांना दिलासा देऊ असे स्पष्ट करत राज्य सरकारला सुद्धा याबाबत कळविण्यात येईल असे स्पष्ट केले.निवेदनावेळी नेवासा काँग्रेसचे शहराध्यक्ष अंजुम पटेल,बसपाचे हरीश चक्रनारायण आदीसह काँग्रेसचे कार्यकर्ते व व्यापारी उपस्थित होते.
*चौकट* – सत्ता मिळाल्यावर लगेच कारवाईला सुरुवात हेच व्यापाऱ्यांचे अच्छे दिन आहे काय? ज्यांनी सत्ता दिली त्यांना उध्वस्त करून जीवन मरणाच्या दारात आणून ठेवणाऱ्या महायुतीचा राज्यभर व्यापाऱ्यांनी निषेध करायला हवा.ज्या बहिणीच्या जीवावर सत्ता मिळवली त्यांना एकविशे रुपये सोडा त्यांची छाननी करून त्यांच्याशी नाते तोडले आहे. या सर्व घटनाची जाणीव ठेवून येथून पुढल्या काळात या सरकारला धडा जनतेने शिकवावा. – *संभाजी माळवदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी*.