जनतेचे निःस्वार्थ सेनानी* *अण्णा हजारे यांचं मार्गदर्शन – तरुणांना दिलं* *भ्रष्टाचारविरोधी चळवळीत सामील होण्याचं आवाहन
पद्मभूषण व पद्मश्री पुरस्काराने सन्मानित भारताचे सामाजिक जननेते अण्णा हजारे यांची नुकतीच भेट घेण्याचा योग आला. अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी येथील निवासस्थानी त्यांच्याशी अन्नावर आधारित संवाद साधण्यात आला.

जनतेचे निःस्वार्थ सेनानी* *अण्णा हजारे यांचं मार्गदर्शन – तरुणांना दिलं* *भ्रष्टाचारविरोधी चळवळीत सामील होण्याचं आवाहन
*नेवासा / वैजापूर / राहुरी / श्रीरामपूर / गंगापूर प्रतिनिधी –*
पद्मभूषण व पद्मश्री पुरस्काराने सन्मानित भारताचे सामाजिक जननेते अण्णा हजारे यांची नुकतीच भेट घेण्याचा योग आला. अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी येथील निवासस्थानी त्यांच्याशी अन्नावर आधारित संवाद साधण्यात आला. या भेटीत अण्णांनी त्यांच्या आयुष्यातील विविध आंदोलनांची माहिती दिली. त्यांचं कार्य पाहून आणि संग्रहालयातील वृत्तमालिका अनुभवून आम्ही भारावून गेलो.
या भेटीदरम्यान नेवासा, वैजापूर, राहुरी, श्रीरामपूर आणि गंगापूर येथील विविध सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. संवादामध्ये लोकपाल विधेयक, माहिती अधिकार, व सध्याची राजकीय परिस्थिती यावर सखोल चर्चा झाली. अण्णांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की, “देशातील तरुणांनी एकत्र येऊन भ्रष्टाचारमुक्त भारत घडवण्याच्या दिशेने पावले उचलली पाहिजेत. माहिती अधिकाराचा प्रभावी वापर करत समाजातील अन्यायाविरुद्ध लढा उभारावा.”
त्यांनी तरुण पिढीला मार्गदर्शन करताना असेही म्हटले की, *”आम्ही आमच्या जीवनाच्या संघर्षात अनेक न्यायप्रविष्ठ निर्णय मिळवून ठेवले आहेत. त्या निर्णयांना जोड देत तुम्ही आजच्या पिढीच्या प्रश्नांची उत्तरं शोधू शकता.”*
अण्णांनी यावेळी सांगितले की, *16 फेब्रुवारी* रोजी झालेला संवाद त्यांच्यासाठीही महत्त्वाचा होता *. “लोकपाल विधेयक संमत झालं हे पाहून समाधान वाटतं,”* असे उद्गार त्यांनी आमच्याशी बोलताना काढले.
या भेटीत अण्णांनी केलेल्या विविध उपोषणांची, आंदोलनांची माहिती दिली. त्यांच्या या कार्यातून तरुणांना आणि समाजसेवकांना प्रेरणा मिळते. जनतेच्या प्रश्नांसाठी अहिंसक मार्गाने आणि निःस्वार्थ भावनेने संघर्ष कसा करावा, याचा आदर्श त्यांच्या कार्यातून दिसतो.
*अण्णा हजारे यांच्या ठळक उपक्रमांची वैशिष्ट्ये:*
राळेगणसिद्धीतील ग्रामविकासाचे मॉडेल
१९९७ पासून सुरू झालेली माहिती अधिकार चळवळ
२०११ मधील लोकपाल विधेयकासाठी केलेलं ऐतिहासिक उपोषण
भ्रष्टाचारविरोधी आंदोलने व सार्वजनिक पैशाचा योग्य वापर यासाठी दिलेला लढा
अशा या महान कार्यकर्त्याशी झालेला संवाद ही आमच्यासाठी स्फूर्तीदायक भेट होती. अण्णांच्या मार्गदर्शनातून आम्हाला नवीन दिशा मिळाली असून, त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही झटत राहू. असे सामाजिक कार्यकर्ते व दक्ष पत्रकार तालुकाध्यक्ष असोसिएशनचे नरेंद्र पाटील काळे यांनी सांगितले यावेळी त्यांच्याबरोबर दक्ष पत्रकार असोसिएशनची संस्थापक सचिन मोईन व संजय ठुबे श्री देशमुख, तसेच कदम साहेब अनेक पदाधिकारी उपस्थित होत
खबरनामा यूट्यूब चैनल माहिती अधिकारात प्राप्त झालेला हा व्हिडिओ मध्ये बातमी पहा
👇👇👇👇👇👇 लाल बटनवर क्लिक करा आणि पहा सविस्तर बातमी